Join us

'बारा' अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याबाबत नोटीस रद्दबातल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 12:27 PM

सिंह यांनी पोलीस आयुक्तपदाची सुत्र हाती घेतल्या नंतर अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक मुंबई याठिकाणी बदली मिळावी यासाठी बारा पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस महासंचालकांना परस्पर पत्र व्यवहार केला, त्यामुळे माजी पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी त्यांची वेतनवाढ एक वर्षासाठी का रोखली जाऊ नये अशी विचारणा करणारी नोटीस बजावली होती. मात्र नवनिर्वाचित पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी नोटीशीला अधिकाऱ्यांनी दिलेले उत्तर समर्थनीय ठरवत ती रद्दबातल ठरवली आहे.

सिंह यांनी पोलीस आयुक्तपदाची सुत्र हाती घेतल्या नंतर अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पोलीस खात्यातील बारा अधिकाऱ्यांनी बर्वे यांच्या काळात पोलीस महासंचालकांना पत्र पाठवत त्यांची एटीएसमध्ये बदली करण्यात यावी असा विनंतीअर्ज दाखल केला होता. यामध्ये सध्या सशस्त्र दलात असलेले नितीन अलकनुरे, भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कदम, मालाड पोलीस ठाण्याचे सुधीर दळवी, मध्य नियंत्रण कक्ष नंदकुमार गोपाळे, संरक्षण आणि सुरक्षा विभागाचे ज्ञानेश्वर वाघ, तत्कालीन खार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चकमकफेम दयानंद नायक, घाटकोपर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीप बने, मलबार हिल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विल्सन रोड्रिक्स, अंबोली पोलीस ठाण्याचे विशाल गायकवाड,गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक  लक्ष्मीकांत साळुंखे, नवघर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपाली आणि गुन्हे शाखा (वेब डेव्हलपमेंट सेंटर) च्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी कोळी यांचा समावेश होता.

बर्वे यांना ही बाब समजल्यानंतर त्या बारा अधिकाऱ्यांचे वर्तन हे बेशिस्त असुन शिस्तबद्ध पोलीस दलास अशोभनीय आहे. त्यानुसार या अधिकाऱ्यांची वर्षभरासाठी वेतन वाढ का रोखण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस त्यांना बजावण्यात आली होती. मात्र सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यानी नोटिशीला दिलेले उत्तर हे समर्थनीय असुन वेतनवाढ रोखण्याच्या शिक्षेबाबतची नोटी रद्दबातल ठरवत त्यांना दिलासा दिला आहे. तसेच पुन्हा अशी बाब त्यांच्याकडून घडणार नाही याची खबरदारी घेण्याबाबतही त्यांना बजावण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi: भाजपा खासदारांच्या बैठकीत नरेंद्र मोदी भावूक; देशाबाबत केलं मोठं विधान, म्हणाले...

मोदींनी सोशल मीडिया सोडू नये, अन्यथा...; संजय राऊत यांचा खोचक टोला

Narendra Modi : ...म्हणून मार्क झुकेरबर्ग यांनी मोदींसाठी बदलला होता आपला प्रोफाईल फोटो

Narendra Modi: 'या' कारणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार सोशल मीडियाला रामराम, रविवारपासून सर्व अकाउंट्स बंद करण्याचा विचार

 

टॅग्स :मुंबई पोलीसमुंबईपोलिसबदली