नवीन शैक्षणिक वर्षाआधी होमी भाभा विद्यापीठासाठी निघणार अधिसूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 02:29 AM2018-12-30T02:29:32+5:302018-12-30T02:29:52+5:30

होमी भाभा क्लस्टर विद्यापीठाच्या मंत्रिमंडळ निर्णयानंतर आता यासंदर्भातील अधिसूचना लवकरच जारी करण्यात येणार असून येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना या विद्यापीठाअंतर्गत अभ्यासक्रमाचा लाभ घेता येईल.

 Notification for Homi Bhabha University before the new academic year | नवीन शैक्षणिक वर्षाआधी होमी भाभा विद्यापीठासाठी निघणार अधिसूचना

नवीन शैक्षणिक वर्षाआधी होमी भाभा विद्यापीठासाठी निघणार अधिसूचना

Next

मुंबई : होमी भाभा क्लस्टर विद्यापीठाच्या मंत्रिमंडळ निर्णयानंतर आता यासंदर्भातील अधिसूचना लवकरच जारी करण्यात येणार असून येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना या विद्यापीठाअंतर्गत अभ्यासक्रमाचा लाभ घेता येईल.
अधिसूचनेनंतर रुसाकडून मिळणाऱ्या निधीतून होमी भाभा क्लस्टर विद्यापीठात समाविष्ट चार महाविद्यालयांना स्वायत्तता मिळणार असून त्यांना नवीन अभ्यासक्रम विकसित करण्याची तसेच विद्यार्थ्यांसाठी नवीन सोयी-सुविधांची पूर्तता करण्याची संधी मिळेल. त्याकरिता प्राध्यापकांसाठी आवश्यक त्या प्रशिक्षणाची सुरुवातही करण्यात आल्याची माहिती रुसाच्या प्रकल्प संचालक मिताली लोचन यांनी दिली.
डॉ. होमी भाभा विद्यापीठाच्या स्थापनेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे अभ्यासक्रम निवडता येतील. उदाहरणार्थ सिडनहॅम कॉलेजच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्याला कला विषयासाठी एल्फिन्स्टन कॉलेजात प्रवेश निवडीचे स्वातंत्र्य यातून मिळेल. विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे अभ्यासक्रम तयार करण्याचे स्वातंत्र्य स्वायत्ततेमुळे महाविद्यालयांना मिळेल, असे लोचन म्हणाल्या. व्हीजेटीआय, सिडनहॅम या महाविद्यालयांत डेटा सायन्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स विषयासाठी प्राध्यापकांकरिता प्रशिक्षण सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.

अभ्यासक्रम परवडणा-या शुल्कात उपलब्ध
सध्या पदवी घेणाºया एकूण विद्यार्थ्यांपैकी एक तृतीयांश विद्यार्थी बी. कॉम शाखेला असून म्युच्युअल फंड्स, इन्शुरन्स यासारख्या क्षेत्रांत मोठे करिअर असूनही केवळ प्रॅक्टिकल माहितीअभावी त्यांना पदवीनंतर निवडलेल्या विषयात लगेचच करिअर करता येत नाही. मात्र आता या क्षेत्रांचे अभ्यासक्रम या विद्यापीठाद्वारे तयार करून विद्यार्थ्यांना परवडणाºया शुल्कात ते शिकता येतील. म्हणजेच पदव्युत्तर शिक्षणानंतरचे प्रशिक्षण त्यांना पदवीदरम्यानच घेता येईल, हे या विद्यापीठाचे वैशिष्ट्य असल्याची माहिती रुसाच्या प्रकल्प संचालक मिताली लोचन यांनी दिली.

Web Title:  Notification for Homi Bhabha University before the new academic year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई