अग्निसुरक्षेतील त्रुटींमुळे बजावली नोटीस
By admin | Published: September 30, 2015 12:43 AM2015-09-30T00:43:07+5:302015-09-30T00:43:07+5:30
अग्निसुरक्षाविषयक त्रुटी आढळल्याने अग्निशमन दलाने ५०७ इमारतींपैकी ३०८ इमारतींना नोटीस बजावली आहे. ७३ ठिकाणी त्रुटींबाबत संबंधितांनी यथोचित कार्यवाही केल्याचे आढळले आहे
मुंबई : अग्निसुरक्षाविषयक त्रुटी आढळल्याने अग्निशमन दलाने ५०७ इमारतींपैकी ३०८ इमारतींना नोटीस बजावली आहे. ७३ ठिकाणी त्रुटींबाबत संबंधितांनी यथोचित कार्यवाही केल्याचे आढळले आहे. २७८ ठिकाणी त्रुटींबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासाठी नियमांनुसार योग्य ती मुदत देण्यात आली
आहे.
अग्निशमन दलाने जुलै ते सप्टेंबर २०१५ या कालावधीत उंच इमारती, अतिउंच इमारती, व्यावसायिक इमारतींसह मॉल्स, हॉटेल्सची अग्निसुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणी केली असून, या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. पाहणीवेळी अपेक्षित कार्यवाही मुदतीत पूर्ण करण्यात येईल, अशी हमी संबंधितांद्वारे देण्यात आली आहे. तथापि, अपेक्षित कार्यवाही मुदतीत पूर्ण झाली नाही तर संबंधितांवर महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व
जीवसुरक्षा अधिनियम २००६ नुसार कायदेशीर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
अग्निसुरक्षाविषयक यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित नसल्याचे आढळून आले होते, अशा ५ इमारतींचा पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. यामध्ये बाटा शू लिमिटेड गाला कमर्शियल, वांद्रे लिंकिंग रोडवरील केएफसी मॉल, अंधेरी-कुर्ला मार्गावरील प्रमुख प्लाझा, मालाड (पश्चिम) परिसरातील पाम स्प्रिंग इमारत व चेंबूर येथील डॉ. सुराणा नर्सिंग होम यांचा समावेश होता.
----------
एच/पश्चिम विभागातील ११ मॉल्सना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. लिंक स्क्वेअर मॉल, वांद्रे (पश्चिम), लिंक कॉर्नर मॉल, खार (पश्चिम), क्रीस्टल शॉपर्स पॅराडाइज मॉल, खार (पश्चिम), श्रीजी प्लाझा, खार (पश्चिम)
न्यू ब्युटी सेंटर, वांद्रे (पश्चिम)
केनिल वर्थ मॉल, वांद्रे (पश्चिम), हायलाइफ मॉल, सांताक्रूझ (पश्चिम), रिलायन्स हायपर मॉल, वांद्रे (पश्चिम), मे. सबर्बिया मॉल, वांद्रे (पश्चिम), मे. रिलायन्स ट्रेन्ड्झ मर्यादित, वांद्रे (पश्चिम) मे. ग्लोबस स्टोअर्स प्रा.लि., वांद्रे (पश्चिम)