कुख्यात दहशतवादी ‘बॉम्ब’ला कानपूरमधून अटक; पॅरोल रजेदरम्यान मुंबईतून झाला होता फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 04:49 AM2020-01-18T04:49:13+5:302020-01-18T04:49:33+5:30

अजमेर बॉम्बस्फोटासह देशभरातील बॉम्बस्फोटांत सहभाग

The notorious terrorist 'bomb' arrested from Kanpur; The absconder was absconding from Mumbai during the parole leave | कुख्यात दहशतवादी ‘बॉम्ब’ला कानपूरमधून अटक; पॅरोल रजेदरम्यान मुंबईतून झाला होता फरार

कुख्यात दहशतवादी ‘बॉम्ब’ला कानपूरमधून अटक; पॅरोल रजेदरम्यान मुंबईतून झाला होता फरार

googlenewsNext

मुंबई : अजमेर बॉम्बस्फोटातील फरार गुन्हेगार मोहम्मद जलीस अन्सारी उर्फ डॉ. बॉम्ब याला उत्तर प्रदेशातील कानपूरमधून शुक्रवारी अटक करण्यात आली. पॅरोल रजेदरम्यान तो मुंबईतून पसार होत देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याला पकडले.

अजमेर येथे १९९३ मध्ये बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. या प्रकरणी सीबीआयने मुंबईच्या आग्रीपाडा येथे राहणाऱ्या जलीस अन्सारी याला अटक केली होती. चौकशीमध्ये त्याचा देशभरात झालेल्या जवळपास ५२ बॉम्बस्फोटांत सहभाग असल्याचे समोर आले. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जलीस याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने त्याला अजमेरमधील तुरुंगात ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याने तुरुंगातून पॅरोलच्या सुटीसाठी अर्ज केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याला २१ दिवसांची सुटी मंजूर केली. जलीस यास अजमेर तुरुंगातून २६ डिसेंबर, २०१९ रोजी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात पाठवण्यात आले. आर्थर रोड तुरुंगातून २८ डिसेंबरला त्याला बाहेर सोडण्यात आले. मात्र १६ जानेवारीनंतर तो हजेरीसाठी आलाच नाही.

...आणि बनला डॉ. बॉम्ब
दहशतवादाचे प्रशिक्षण घेण्यासाठी जलीसने १९९२ मध्ये बांगलादेशमार्गे पाकिस्तानात प्रवेश केला. दहशतवादी संघटना हुजी तसेच इंडियन मुजाहिद्दीनच्या तो संपर्कात होता. १९८२ मध्ये मुंबईच्या सायन रुग्णालयातून त्याने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. टीएनटी आणि टायमर बॉम्ब बनविण्यात त्याचा हातखंडा असून हैदराबाद, मालेगाव, पुणे, अजमेर या ठिकाणी घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. १९८८ मध्ये आजम गौरी याने अब्दुल करीम तुंडा याच्याशी त्याची भेट घडवली. तो देशी पद्धतीने बॉम्ब तयार करण्यात पारंगत होता. त्याच्याकडूनच जलीसने बॉम्ब तयार करण्याचे कौशल्य अवगत केले आणि त्याला डॉ. बॉम्ब हे नाव पडले.

‘रेड अ‍ॅलर्ट’ आणि जलीस सापडला !
तो उत्तर प्रदेशला पळाल्याची माहिती एटीएसला मिळाली आणि त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांकडे मदत मागितली. जलीसच्या पलायनाची माहिती मिळाल्यावर देशभरात रेड अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला होता. मुंबईतून लखनऊला येणाºया रेल्वे गाड्यांची तपासणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफ विभागाने सुरू केली. जलीस कानपूरला असल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना मिळाली. त्यांनी त्यास फेथफुलगंज परिसरातून ताब्यात घेतले. याबाबत महाराष्ट्र एटीएसलाही कळविण्यात आले.

Web Title: The notorious terrorist 'bomb' arrested from Kanpur; The absconder was absconding from Mumbai during the parole leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.