Join us

आता ५० वर्षांवरील सर्व बाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 4:25 AM

५० वर्षांवरील सर्व बाधित रुग्णांना आता घरीच अलगीकरण करण्याची सूट मिळणार नाही. वयाची पन्नाशी पार केलेल्या सर्व कोरोनाबाधित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे लागणार आहे.

मुंबई : कोरोनामुळे मुंबईत आतापर्यंत ७३११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र यामध्ये ८० टक्के मृत्यू ५० हून अधिक वयोगटात आढळून आले आहेत. याची गंभीर दखल घेऊन ५० वर्षांवरील सर्व बाधित रुग्णांना आता घरीच अलगीकरण करण्याची सूट मिळणार नाही. वयाची पन्नाशी पार केलेल्या सर्व कोरोनाबाधित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे लागणार आहे.मुंबईत आतापर्यंत एक लाख ३२ हजार ८१७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी एक लाख सात हजार कोरोनामुक्त झाले आहेत. यापैकी सहा हजार रुग्ण ५० वर्षांवरील असून ६० ते ६९ या वयोगटात २,०१२ मृत्यू झाले आहेत. ज्येष्ठ नागरिकांमध्ये रोग प्रतिकार शक्ती कमी असणे, तसेच मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंडाच्या आजाराचे प्रमाण अधिक असते. महापालिकेने आता ५० वर्षांवरील सर्व व्यक्तींना तात्काळ चांगले उपचार मिळावे, यासाठी धावपळ सुरू केली आहे. यापुढे ५० वर्षांवरील सर्व रुग्ण, त्यांच्यामध्ये गंभीर आजार असल्यास अथवा नसल्यास, लक्षणे नसल्यास किंवा सौम्या लक्षणे असल्यास त्यांना महापालिकेच्या केअर सेंटर दोनमध्ये दाखल व्हावे लागणार आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस