आता सगळ्यांचे टार्गेट ‘रेल्वे’प्रवासी

By admin | Published: September 30, 2014 11:35 PM2014-09-30T23:35:30+5:302014-09-30T23:35:30+5:30

रॅली, प्रचारसभा करुन दमलेल्या उमेदवारांना आता सकाळपासूनच रेल्वे प्रवाशांच्या हातापाया पडण्यासाठी सज्ज व्हावे लागणार आहे.

Now all the travelers 'train' migrants | आता सगळ्यांचे टार्गेट ‘रेल्वे’प्रवासी

आता सगळ्यांचे टार्गेट ‘रेल्वे’प्रवासी

Next
>अनिकेत घमंडी ल्ल डोंबिवली 
रॅली, प्रचारसभा करुन दमलेल्या उमेदवारांना आता सकाळपासूनच रेल्वे प्रवाशांच्या हातापाया पडण्यासाठी सज्ज व्हावे लागणार आहे. त्यासाठी गर्दीच्या वेळेतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांची प्रवेशद्वारे आणि पादचारी पूलाच्या जागांना टार्गेट करण्यात आले असून उमेदवाराआधीच कार्यकत्र्याना सज्ज होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात प्रचाराचे नेमके कोणकोणते मुद्दे असावेत यासाठी ठाण्यापासून - बदलापूर आणि कसारा स्थानकार्पयत बहुतांशी सर्वच पक्ष उमेदवारांनी कंबर कसली आहे.
यासाठी केंद्रिय, विभागीय, तसेच स्थानिक स्तरावरील विविध प्रसंगातील रेल्वेतून प्रवासाच्या फोटोसह अन्य प्रकल्पांच्या शुभारंभाचे फोटो, वृत्तपत्रंमधील कात्रणो यांसह केलेला आणि यशस्वी झालेला पत्रव्यवहाराची आकर्षक मांडणी करण्याचे योजिले आहे.  रेल्वे प्रवाशांच्या समस्यांसह त्यांच्यासाठी आगामी काळात करण्यात येणा:या मागण्या आणि त्यासाठीचे नियोजन प्रवाशांसमोर मांडणार असल्याचे दर्शनास येत आहे. त्यामुळे येथेही केवळ मतदारांना उद्देशून पत्रके-पुरवण्या काढण्यात येणार आहेत. सर्वाचाच अजेंडा हा भविष्याचा वेध घेणारा असून त्यासाठी  भूतकाळात काय केले हे सांगणारा असल्याने प्रवाशांच्या पसंतीस नेमका कोण उतरतो हे महत्वाचे ठरणार आहे.
महिलांसाठी विशेष लोकल, स्टुडंट लोकल-डबा, ज्येष्ठांसह अपंगांसाठी फलाटात आल्यावर गाडीत चढण्यासाठीचा स्टँड, लांबपल्याच्या गाडय़ांना डोंबिवलीसह दिव्यात थांबा, दिवा - सीएसटी सह कल्याण - पनवेल व्हाया दिवा, पादचारी पूल, ठाकुर्लीचा प्रलंबित रोड ओव्हर ब्रीज आणि दिव्याचीही समस्या, स्वच्छतागृहे, बाकडी, वेटींग रुम, अपघात झाल्यास प्रथमोपचारासह अद्ययावत रुग्णालयात ‘गोल्डन अवर’ मध्ये दाखल करण्यासाठी नियोजन अशा निदान कागदावर तरी आाखलेल्या अॅक्शन प्लॅनबाबत प्रवाशांशी चर्चा करण्यात येणार आहे. 
 
लाखो प्रवाशांकडे 
मतांचा जोगवा 
4या सर्व नियोजनातून  बदलापूर अडीच लाख, अंबरनाथ दोन लाख, उल्हासनगर - दोन लाख, विठ्ठलवाडी व कल्याण - अडीच लाख, डोंबिवली-कोपर-ठाकुर्ली - सहा लाख, दिवा-मुंब्रा-कळवा सहा लाख,  ठाण्यातून सात, टिटवाळा दीड लाख, आसनाग एक लाख, कसारा आदी ठिकाणांहून रेल्वेने जाणा-या लाखो चाकरमान्यांना एकाच वेळी मतांचा जोगवा मागता येईल. तसेच एकाच वेळी मोठय़ा जनसमुदायासमोर जाण्याची संधी राजकीय पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले.
 
4लोकसभेच्या निवडणूकीत ठाणो जिल्ह्यात महत्वाच्या शहरांमध्ये मनसेचे इंजिन  रस्त्यावर फिरत असल्याने ते अबालवृद्धांसाठी आकर्षण होते, मात्र विरोधकांनी त्यावरही टिका करण्याची संधी सोडलेली नव्हती. त्या पक्षाचे कार्यकर्ते सकाळपासून रेल्वे स्थानकांकडे प्रचार करत असले तरीही यांचे इंजिन भलतीकडेच असल्याने यांचे इंजिन रुळावर असण्याएवजी रस्त्यावर आल्याने ते भरकटले का? काहींनी ते येण्याआधीच त्यांचे इंजिन रस्त्यावर उतरल्याने यांची गाडी आधीच घसरल्याची चर्चा करत विरोधक प्रवाशांमध्ये खिल्ली उडवली होती. त्यामुळे या पेक्षा काही वेगळे करुन ‘इंजिन’ चिन्ह जनमानसावर बिंबवण्यासाठी प्रय} करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
 
4सध्या सर्वच राजकीय नेत्यांचे लक्ष निवडणुकीकडे लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यावर प्रचारादरम्यान लाखो रेल्वे प्रवाशांना दररोज भेडसावणा-या समस्यांवर सर्वच नेते भर देतील, अशी अपेक्षा आहे. 
4अनेक वर्षे उपनगरी पास व तिकीटाचे दर न वाढवल्याने आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या रेल्वेला संजीवनी देण्यासाठी गेल्या दीड दोन वर्षांत अनेकदा हे दर वाढवण्यात आले. बजेटआधी पासचे दर जवळपास दुपटीने वाढवण्यात आले. या निर्णयाला कडाडून विरोध झाल्यावर ही भाडेवाढ अंशत: मागे घेण्यात आली. 

Web Title: Now all the travelers 'train' migrants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.