Join us

आता शाळांना देखील पाच दिवसाचा आठवडा करा, संघटनांची मागणी  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 4:28 PM

शाळांनादेखील पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी जनता शिक्षक महासंघाचे  मुंबई-कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी आज शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे.

मुंबई - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा राज्य मंत्रीमंडळाने आज जाहीर केला त्याच धर्तीवर राज्यातील शाळांनादेखील पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी जनता शिक्षक महासंघाचे  मुंबई-कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी आज शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे.

माध्यमिक शाळा संहितेनुसार शाळा पाच दिवसांचा आठवडा करू शकतात. अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी आपल्या शाळांचा आठवडा पाच दिवसांचा केला आहे. पण बहुतांश शाळा अजूनही सहा दिवस भरतात. शनिवारी अर्धा दिवस शाळा असते. शनिवारच्या अर्ध्या दिवसाच्या तासिका सोमवार ते शुक्रवार विभागून देता येऊ शकतात त्यामुळे पाच दिवसांचा आठवडा शक्य असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.  मुंबईतील अनेक शाळा ह्या दुबार अधिवेशनात भरतात. दोन्ही अधिवेशनातील शाळा १५ मिनिटे आधी व १५ मिनिटे उशिरा सोडून पाच दिवसांचा आठवडा करणे शाळांना सहज शक्य असल्याने  शालेय शिक्षण विभागाने याबाबत शासन निर्णय काढून शाळांचा पाच दिवसांचा आठवडा करावा.

टॅग्स :शाळाशिक्षण क्षेत्रमहाराष्ट्र सरकार