आता बाप्पाच्या मंडपाची परवानगी झाली सुलभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 02:22 AM2018-07-21T02:22:00+5:302018-07-21T02:22:16+5:30

गणेशोत्सव, नवरात्रौत्सव काळात मंडपासाठी मुंबई पोलीस व वाहतूक पोलिसांची स्वतंत्र परवानगी घेण्यास बराच वेळ लागत होता.

Now Bappa Mandal's permission is easy! | आता बाप्पाच्या मंडपाची परवानगी झाली सुलभ!

आता बाप्पाच्या मंडपाची परवानगी झाली सुलभ!

Next

मुंबई : गणेशोत्सव, नवरात्रौत्सव काळात मंडपासाठी मुंबई पोलीस व वाहतूक पोलिसांची स्वतंत्र परवानगी घेण्यास बराच वेळ लागत होता. मात्र, गणेशोत्सव मंडळांची ही गैरसोय आता दूर होणार आहे. ही सर्व परवानगी प्रक्रिया मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून आॅनलाइन पद्धतीने पूर्ण करता येईल. portal.mcgm.gov.in (www.mcgm.gov.in)  या संकेतस्थळावर सादर होणारा हा अर्ज स्वयंचलित पद्धतीने मुंबई पोलीस व वाहतूक पोलिसांकडून मंजूर होणार आहे. त्यामुळे मंडळांना घरबसल्या आॅनलाइन पद्धतीने अर्ज व मंजुरी मिळविणे शक्य होणार आहे.
उत्सव काळात मंडप व प्रवेशद्वार उभारणी करण्याकरिता महापालिकेद्वारे परवानगी घेणे आवश्यक असते, तसेच यासाठी अर्ज करताना, त्यासोबत मुंबई पोलिसांचे व वाहतूक पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्रदेखील आवश्यक असते. याबाबत पूर्वी मंडळांना महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयात स्वत: जाऊन अर्ज
द्यावा लागत असे, तसेच हा अर्ज
सादर करताना, त्यासोबत पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्रदेखील
स्वत: पायपीठ करून घ्यावे लागत असे.
या संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार आॅनलाइन अर्ज सुविधा नुकतीच सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान खात्याद्वारे देण्यात आली. आॅनलाइन पद्धतीने अर्ज करताना काही समस्या उद्भवल्यास त्याबाबत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अधिकृत माहिती मिळावी, यासाठी महापालिकेच्या वरळी येथील अभियांत्रिकी संकुलातील माहिती तंत्रज्ञान खात्याद्वारे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
>येथे करा अर्ज
महापालिकेच्या स्रङ्म१३ं’.ेूॅे.ॅङ्म५.्रल्ल (६६६.ेूॅे.ॅङ्म५.्रल्ल) या संकेतस्थळावर जावे. यासाठी प्राधान्याने इंटरनेट एक्सप्लोरर हे वेब ब्राउजर वापरावे. महापालिकेचे संकेतस्थळ उघडल्यानंतर, त्याच्या मुख्य पृष्ठावर आॅनलाइन सेवा या पर्यायावर माउस पॉइंटर नेल्यानंतर ड्रॉप डाउन मेनू दिसतो. यामध्ये चौदाव्या क्रमांकावर परिरक्षण ही लिंक आहे. या लिंकवर माउस पॉइंटर नेल्यावर पाचव्या क्रमांकावर गणपती/नवरात्री अशी लिंक दिसते. या लिंकवर क्लिक केल्यानंतर जे वेबपेज उघडले जाते, त्यावर आॅनलाइन अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. हा पर्याय संबंधित कालावधीसाठी उपलब्ध असेल. याच वेबपेजवर इंडेम्निटी बाँडचे प्रारूपही उपलब्ध आहे. आॅनलाइन अर्ज प्रक्रियेदरम्यान हे प्रारूप भरून व स्कॅन करून तयार ठेवणे आवश्यक आहे.

Web Title: Now Bappa Mandal's permission is easy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.