आता इमारतीसाठी ७० परवानग्या आवश्यक

By admin | Published: October 24, 2015 02:45 AM2015-10-24T02:45:29+5:302015-10-24T02:45:29+5:30

मुंबई महापालिकेच्या अंतर्गत एखादी इमारत बांधायची झाल्यास अनेक परवानग्यांना सामोरे जावे लागत असे. पण आता इमारतीच्या प्रस्तावासाठी केवळ ७० परवानग्या आवश्यक करण्यात

Now the building requires 70 permissions | आता इमारतीसाठी ७० परवानग्या आवश्यक

आता इमारतीसाठी ७० परवानग्या आवश्यक

Next


मुंबई : मुंबई महापालिकेच्या अंतर्गत एखादी इमारत बांधायची झाल्यास अनेक परवानग्यांना सामोरे जावे लागत असे. पण आता इमारतीच्या प्रस्तावासाठी केवळ ७० परवानग्या आवश्यक करण्यात आल्या आहेत. आधी वेगवेगळ्या खात्यांतील तब्बल २०० परवानग्या मिळवणे बंधनकारक होते. पैकी १३० परवानग्यांची काहीही गरज नसल्याचे लक्षात आल्याने ते रद्द ठरवण्यात आल्याचे आयुक्त अजय मेहता यांनी सांगितले.
इमारत प्रस्तावासाठी अर्ज करताना संबंधितांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे. आतापर्यंत इमारतीसाठी तब्बल २०० परवानग्यांची गरज असे. त्या मिळवताना संबंधितांची दमछाक होत असे. त्यापैकी १३० परवानग्यांची काहीच गरज नसल्याचे लक्षात आल्याने आता केवळ ७० परवानग्या आवश्यक करण्यात आल्या आहेत. शिवाय या परवानग्यांसाठीची रक्कम एकाच ठिकाणी जमा करावी लागणार आहे. ९० दिवसांत यासंबंधीच्या परवानग्या एकत्र उपलब्ध होतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याबाबतचे कामकाज सुरू होईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Now the building requires 70 permissions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.