आता ‘बुलेटप्रूफ मोबाइल मोर्चा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2016 04:24 AM2016-10-13T04:24:02+5:302016-10-13T04:24:02+5:30

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा करतानाच दहशतवाद्यांविरोधात कडवा प्रतिकार करता यावा यादृष्टीने मध्य रेल्वे सुरक्षा दलाने आपल्या जवानांसाठी ‘बुलेटप्रूफ मोबाइल मोर्चा’ प्रकारातील

Now 'Bulletproof Mobile Front' | आता ‘बुलेटप्रूफ मोबाइल मोर्चा’

आता ‘बुलेटप्रूफ मोबाइल मोर्चा’

googlenewsNext

मुंबई : रेल्वे प्रवाशांची सुरक्षा करतानाच दहशतवाद्यांविरोधात कडवा प्रतिकार करता यावा यादृष्टीने मध्य रेल्वे सुरक्षा दलाने आपल्या जवानांसाठी ‘बुलेटप्रूफ मोबाइल मोर्चा’ प्रकारातील चौक्या स्थानकांत बसविण्याचा निर्णय घेतला आहे. चार स्थानकांत अशा सहा चौक्या पुढील वर्षापर्यंत बसविण्यात येतील, अशी माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली.
कल्याण, दादरला प्रत्येकी एक आणि एलटीटी व सीएसटी येथे प्रत्येकी दोन पोलादी चौक्या बसविल्या जातील. या चौकीची उंची साधारपणे साडेचार ते पाच फुटांच्या आसपास असेल. त्यांना खालील बाजूस चाके असल्याने त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलविता येतील. सहा बुलेटप्रूफ मोर्चांची किंमत ही ४ ते पाच लाख रुपये आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Now 'Bulletproof Mobile Front'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.