आता अनारक्षित खिडक्यांवरही आरक्षण रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2015 02:59 AM2015-12-02T02:59:29+5:302015-12-02T02:59:29+5:30

तिकिटांचे आरक्षण रद्द करण्याच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे.

Now cancellation of reservation in unreserved windows | आता अनारक्षित खिडक्यांवरही आरक्षण रद्द

आता अनारक्षित खिडक्यांवरही आरक्षण रद्द

Next

मुंबई : तिकिटांचे आरक्षण
रद्द करण्याच्या नियमांत
बदल करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. नव्या नियमानुसार प्रवाशांच्या सोयीसाठी तिकिटांचे आरक्षण अनारक्षित खिडकयांवरही
रद्द करण्याची सोय
प्रवाशांना उपलब्ध करण्यात येणार आहे.
१ डिसेंबरपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या सोयीमुळे प्रवासी आरक्षण केंद्रापर्यंत न जाता स्थानकांवरील तिकिट खिडकयांवर जाऊनही आरक्षण रद्द करु शकतील,
असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ
विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ.आलोक बडकुल यांनी
सांगितले. यासाठी सॉफ्टवेअरमध्ये
काही बदलही करण्यात
आले आहेत. मध्य रेल्वेबरोबरच पश्चिम रेल्वेवरही या
नियमाची अंमलबजावणी होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Now cancellation of reservation in unreserved windows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.