Join us

आता मुंबईत बहरणार निवडुंगाची बाग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 6:00 AM

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा पुढाकार; विविध प्रजाती पाहायला मिळणार

- सागर नेवरेकर मुंबई : काटेरीपणामुळे निवडुंग काहीसा दुर्लक्षित राहतो, पण आता याच निवडुंगाची बाग मुंबईकरांना बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाहायला मिळणार आहे. सध्या उद्यानात बागेचे काम सुरू आहे.राष्ट्रीय उद्यानात २२ ते २५ निवडुंगाच्या प्रजाती लावण्यात आल्या आहेत, याशिवाय आणखी ३० ते ४० प्रजाती लावल्या जाणार आहेत.निवडुंगाच्या कमीतकमी सहा हजार प्रजाती आढळून येतात. इचीनो कॅक्टस ग्रुसोनील, अस्ट्रो फायटम अर्नाटम, मॅमेलीरिया, जिग्नोकॅल्शियम, नोटाकॅक्टस, क्रिस्टिटा आणि ओल्डमॅन इत्यादी निवडुंगाच्या प्रजाती पाहायला मिळतात, तसेच काही प्रजातींच्या २०० ते २५० उपप्रजातीसुद्धा असतात. अमेरिकेमध्ये ओल्डमॅन निवडुंगाखाली माणसे उभी राहून छायाचित्रे काढतात. अशा प्रकारे जगभर छोट्या-मोठ्या प्रजाती दिसून येतात.विविध प्रजातींचे निवडुंग हे बॉटनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आवश्यक असते. यातील वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास करण्यासाठी बॉटनी विद्यार्थ्यांना आता उद्यानाचा आधार मिळेल. भुवनेश्वरमधून बऱ्याचशा प्रजाती आणण्यात आल्या आहेत, तसेच मॅक्सिको, थायलंड, उत्तर अमेरिका आदी देशांतूनही निवडुंगाच्या प्रजाती येथे आणल्या आहेत. देशात भुवनेश्वर आणि दार्जिलिंग येथे निवडुंगाच्या नर्सरी आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अनेक प्रजातींची झाडे लावण्यात आली आहेत, परंतु आता निवडुंग बाग हे या उद्यानाचे वेगळेपण ठरेल. मुंबईकरांना लवकरच निवडुंगाच्या विविध प्रजाती बागेच्या रूपात येथे पाहायला मिळतील, अशी माहिती निवडुंग तज्ज्ञ किशोर राऊत यांनी दिली.बऱ्याचशा प्रजाती वनौषधीअपोयिशा ही निवडुंगाची अशी प्रजात आहे की, हिच्यामुळे कर्करोग बरा होतो. अमरावतीमध्ये एक व्यक्ती या निवडुंगाचे सेवन करत असून, त्याचा कर्करोग बरा होत आला आहे, असा दावा करण्यात येत आहे. युफोरबिया प्रजातींच्या निवडुंगामध्ये दुधासारखा द्रव्य असतो. याच्या उपयोगाने त्वचा विकार बरे होतात. त्यामुळे बºयाचशा निवडुंगाच्या प्रजाती या वनौषधी असतात, तर काहींवर संशोधन सुरू आहे.