आता मुंबई, पुण्यात क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानाने होणार कोरोना तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 06:09 AM2021-04-30T06:09:01+5:302021-04-30T06:10:06+5:30

एनएबीएलची मान्यता मिळणारी देशाची पहिली लॅब, टाटाचा उपक्रम

Now Corona inspection will be done in Mumbai, Pune with Crisper Cass technology | आता मुंबई, पुण्यात क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानाने होणार कोरोना तपासणी

आता मुंबई, पुण्यात क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानाने होणार कोरोना तपासणी

googlenewsNext

अतुल कुलकर्णी 

मुंबई : कोरोनाची तपासणी करण्याकरिता टाटा समूहाने आता क्रिस्पर कॅस तंत्रज्ञान आणले आहे. त्यामुळे रुग्णांचा स्वॅब जास्त अचूकतेने व गतीने मिळणार आहे. यासाठी आयसीएमआर आणि एनएबीएल यांनी मुंबईतील या लॅबला मान्यता दिली आहे. शुक्रवारपासून याच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुण्यामध्ये ही मोबाईल लॅब सुरू होत आहे. ही लॅब आता टाटा उद्योग समूहाबरोबर वैद्यकीय क्षेत्रातील क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानातील सामंजस्य करारातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण करणारी भारतातील पहिली लॅब ठरली आहे.

क्रिस्पर कॅस तंत्रज्ञान (क्लस्टरली रेग्युलरली इंटरस्पेस शॉर्ट प्लँट्रोमिक रिपीट/Clustered Regularly Interspaced Short Palindromic Repeats and CRISPR-associated - Cas) वैद्यकीय क्षेत्रातील मैलाचा दगड ठरणार असून सदर तंत्रज्ञानानुसार कोरोनाचे निदान अचूक व कमी वेळात होणार आहे.सदर तंत्रज्ञानामुळे कोविड -१९ मधील कोरोनाबाबत निदान करण्याची अचूकता आता कित्येक पटीने वाढणार असून अँटिजेन टेस्टिंग व आरटी-पीसीआर तपासणीपेक्षा सदर तंत्रज्ञानाने होणारी तपासणी कित्येक पटीने अचूक राहणार आहे. 

या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्वॅब घेतल्यापासून दोन ते तीन तासात रिपोर्ट येतो. रोज कमीत कमी ५०० ते २००० तपासण्या एका लॅबमध्ये २४ तासात होतात. स्वॅब घेणाऱ्यांकडे मोबाईलवर एक ॲप तयार करून दिले आहे. त्यात त्याची माहिती भरल्यानंतर ज्यावेळी रिपोर्ट तयार होतो तेव्हा तो रुग्णाच्या मेलवर किंवा मोबाईलवर आणि आयसीएमआरच्या पोर्टलवर एकाच वेळी जातो. त्यामुळे यात मोठा वेळ वाचणार आहे. शिवाय या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने युके, साऊथ आफ्रिकन, ब्राझिलियन व्हेरियंट देखील सहजपणे तपासता येणार आहेत.     - डॉ. विक्रांत सनगर, लॅबचे प्रमुख 

आरटीपीसीआरप्रमाणे स्कोअर देणार

आरटीपीसीआर तपासणी करताना रुग्ण पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे शोधण्यासाठी जो स्कोअर देण्यात येतो तसाच तो येथेही देण्यात आला आहे. १० पेक्षा खाली स्कोअर आला तर रुग्ण निगेटिव्ह असेल. १० ते २० च्या मध्ये आला तर तो काठावर पॉझिटिव्ह असेल आणि २० च्या वर आला तर तो पूर्णपणे पॉझिटिव्ह असेल, असा अर्थ या चाचणीतून निघेल. शुक्रवारपासून पुण्यामध्ये याच तंत्रज्ञानाने मोबाईल लॅबही कार्यान्वित होईल.

Read in English

Web Title: Now Corona inspection will be done in Mumbai, Pune with Crisper Cass technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.