आता नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 03:01 AM2019-07-31T03:01:17+5:302019-07-31T03:01:22+5:30
गटनेत्यांची मंजुरी; महिनाभरात होणार अंमलबजावणी; सभागृहाच्या बाहेर लागणार यंत्र
मुंबई : पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच नगरसेवकांचीही बायोमेट्रिक हजेरी घेतली जाणार आहे. सभागृहाबाहेरील यंत्रावर आपल्या बोटाचा ठसा उमटवल्यानंतरच सर्वपक्षीय नगरसेवकांना महासभेचे द्वार उघडणार आहे. त्यामुळे दांडीबहाद्दर नगरसेवकांची नोंद होणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत एकमताने मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार लवकरच सभागृहाबाहेर बायोमेट्रिक हजेरीचे यंत्र लागणार आहे.
मुंबईतील २२७ प्रभागांमधून निवडून आलेले नगरसेवक आपल्या जनतेचे प्रतिनिधित्व पालिका महासभेत करीत असतात. अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न हाताळून प्रशासनाला धारेवर धरण्याची ताकद नगरसेवकांना या सभागृहानेच मिळवून दिली आहे. दर महिन्याला होणाºया या बैठकांमध्ये हजेरी लावण्यासाठी नगरसेवकांना भत्ताही मिळतो. मात्र बहुसंख्य नगरसेवक या सभांना दांडी मारतात. तर अनेक नगरसेवक सभागृहाबाहेरील मस्टरवर सही करून पळ काढतात. सर्वच पक्षांत असे दांडीबहाद्दर नगरसेवक असल्याने त्यांना चाप बसावा, अशी गटनेत्यांची इच्छा होती.
प्रत्येक महासभेसाठी मिळतात दीडशे रुपये
च्नगरसेवकाला प्रत्येक महासभेला हजेरी लावण्यासाठी दीडशे रुपये मिळतात. एका महासभेवर महापालिकेकडून १० ते १५ हजार रुपये खर्च करण्यात येतो.
च्सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी व बाहेर जाताना बायोमेट्रिक हजेरी नगरसेवकांना बंधनकारक करण्यात आले आहे. महापौर आणि उपमहापौरांना मात्र बायोमेट्रिक हजेरीची सक्ती नसेल.
च्नगरसेवकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आहे. वाहतूककोंडी, रेल्वे प्रवास करून येणाºया नगरसेवकांना काही वेळा महासभेस हजर राहण्यास विलंब होतो.
च्२०१८ मध्ये नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्याचा निर्णय गटनेत्यांनी घेतला होता. मात्र वर्षभर यावर अंमल होऊ शकलेला नाही. आता या निर्णयाची अंमलबजावणी महिन्याभरात होण्याची शक्यता आहे.
सक्ती नाममात्रच
त्यानुसार नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. सभागृहाबाहेर बायोमेट्रिक यंत्र लागल्यावर यावर अंमल सुरू होईल. त्यामुळे सभागृहात कोणता नगरसेवक किती वाजता आला, त्याने किती वाजता सभागृह सोडले याची माहिती संबंधित राजकीय पक्षांनाही मिळू शकेल. मात्र नगरसेवक गैरहजर असेल, तर बैठकीला उपस्थितीत राहण्याचा हफ्ता कापण्यात येईल. परंतु, उशिरा येणारे, लवकर जाणारे व बैठकीत बसून न राहता सभागृहाबाहेर फेरफटका मारणाºया नगरसेवकांवर कारवाई करण्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे ही सक्ती म्हणजे
नाममात्रच ठरणार आहे.