नगरसेवकांची आता पायपीट सुरू

By admin | Published: October 5, 2016 03:48 AM2016-10-05T03:48:33+5:302016-10-05T03:48:33+5:30

प्रभाग फेररचनेचा सोमवारी झटका बसल्यानंतर बिथरलेले नगरसेवक मंगळवारी अखेर भानावर येत कामाला लागले आहेत़ आपापल्या प्रभागाची सीमारेषा

Now the councilors started the footpath | नगरसेवकांची आता पायपीट सुरू

नगरसेवकांची आता पायपीट सुरू

Next

मुंबई : प्रभाग फेररचनेचा सोमवारी झटका बसल्यानंतर बिथरलेले नगरसेवक मंगळवारी अखेर भानावर येत कामाला लागले आहेत़ आपापल्या प्रभागाची सीमारेषा व आपले मतदार कुठे हे जाणून घेण्यासाठी त्यांची धावपळ सुरू झाली आहे़ त्याचबरोबर आपल्यापुढील पर्यायांची चाचपणीही अनेकांनी सुरू केली आहे़ त्यामुळे निवडणुकीचे बिगूल वाजण्यापूर्वीच सर्वपक्षीय नगरसेवकांची पायपीट सुरू झाल्याचे दिसून आले.
पूर्वी आरक्षणातून प्रभाग सुटल्यानंतर नगरसेवक थेट प्रचाराला व आपल्या प्रभागातील विकासकामांचा बार उडवून देण्याच्या मागे लागत असत. मात्र प्रभाग फेररचनेने गेल्या पाच वर्षांच्या त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे़ प्रभाग फेररचनेत हक्काचा प्रभाग फुटल्यामुळे विकासकामांचा बार उडविणे म्हणजे तेथून निवडणूक लढविणाऱ्याची सोय करून देण्यासारखे होणार आहे़ त्यामुळे विद्यमान प्रभागातील नगरसेवकांचा उत्साह कमी झाला आहे़ याउलट फेररचनेत आलेल्या प्रभागाकडे सर्वांनी धाव घेण्यास सुरुवात केली आहे़
काही नगरसेवकांचे प्रभाग फुटून ते तीन-चार प्रभागांत गेल्यामुळे नगरसेवक संभ्रमात आहेत. त्यामुळे आपला जास्त मतदार कुठे विभागला गेला आहे, याचा अभ्यास अनेकांनी सुरू केला आहे़ त्यानुसार निवडून येण्याची संधी अधिक असलेल्या प्रभागांमध्ये या नगरसेवकांनी चाचपणी सुरू केली आहे़ यासाठी कार्यकर्त्यांनाही कामाला लावण्यात आले आहे़ तर प्रभाग नवीन असल्याने इच्छुकांचाही सध्या गोंधळच उडाला आहे़ यामुळे सध्या तरी नगरसेवक व इच्छुक प्रचारापूर्वी आपल्या प्रभागांच्याच अभ्यासाला लागल्याचे चित्र आहे़ (प्रतिनिधी)

बंडखोर वाढणार
आरक्षण आणि फेररचनेमुळे एकाच प्रभागात एकाच पक्षाच्या दोन उमेदवारांच्या मतदारांची विभागाणी झाली आहे़ यामुळे तिकीट वाटपाच्या वेळी पक्षनेत्यांसमोर
पेच निर्माण होणार आहे़ परिणामी मोठ्या प्रमाणात बंडखोरीही होण्याची शक्यता आहे़ आपल्या पसंतीच्या प्रभागाचे तिकीट मिळवण्यासाठी नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरू होणार आहे़


दिग्गजांपुढे पर्याय
स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांचा
सध्याचा प्रभाग राखीव आहे़ तरी त्यांनी यापूर्वी
निवडणूक लढविलेला व सध्याच्या नवीन प्रभागाप्रमाणे ६८ क्रमांकाचा प्रभाग खुला झाला आहे़ तसेच जुना
प्रभाग क्रमांक ६० मध्ये समाविष्ट झाल्याने या
दोन्ही प्रभागांतून निवडणूक लढविण्याची संधी त्यांना आहे़
राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांना प्रभाग क्ऱ ११७ महिलांकरिता आरक्षित झाला आहे, तर भांडुप पश्चिम येथील प्रभाग क्ऱ ११४ व ११५ हे प्रभाग खुले झाले आहेत़ या प्रभागामध्ये पिसाळ यांनी २००७ मध्ये निवडणूक लढविली होती़ त्यामुळे या दोन्ही प्रभागांत त्यांना संधी आहे़ प्रभाग क्ऱ १११ मध्ये त्यांच्या पत्नीही निवडणूक लढविण्याची शक्यता आहे़

माजी नगरसेवकांनाही संधी : माजी नगरसेवक सुभाष सावंत, विश्वनाथ महाडेश्वर, मनोहर पांचाळ यांचे प्रभाग खुले झाले आहेत़ त्यामुळे त्यांच्या नगरसेवक पत्नींच्या जागी त्यांना निवडणूक लढविता येणार आहे. आरोग्य समितीच्या माजी अध्यक्षा शिवसेनेच्या विभागप्रमुख राजुल पटेल यांचा प्रभाग खुला झाल्यामुळे त्यांना पुन्हा संधी प्राप्त होण्याची शक्यता वाढली आहे.


88%
८८ टक्के वॉर्डमध्ये प्रभागांच्या फेररचनेत बदल झाल्याने महापौरांपासून विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांची अवस्था ‘जोर का झटका धीरेसे लगा...’ अशी झाली आहे. तसेच आता प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यामुळे संबंधित दावेदारांना स्फूर्ती चढली आहे.

आर नॉर्थ
प्रभाग आरक्षण
१खुला (महिला)
२खुला
३ खुला
४ खुला (महिला)
५ इतर मागास वर्ग
६ इतर मागास वर्ग
७ खुला (महिला)
८ खुला

आर सेंट्रल
प्रभाग आरक्षण
९ इतर मागास वर्ग
१० इतर मागास वर्ग
११ खुला
१२ खुला
१३ खुला
१४ खुला (महिला)
१५ खुला
१६ खुला (महिला)
१७ खुला (महिला)
१८ खुला


आर साऊथ
प्रभाग आरक्षण
१९ खुला (महिला)
२० खुला
२१ इतर मागास वर्ग (महिला)
२२ इतर मागास वर्ग (महिला)
२३ खुला
२४ खुला (महिला)
२५ खुला (महिला)
२६ अनुसुचित जाती (महिला)
२७ इतर मागास वर्ग (महिला)
२८ इतर मागास वर्ग
२९ खुला
३० खुला (महिला)

पी नॉर्थ
प्रभाग आरक्षण
३१इतर मागासवर्गीय
३२इतर मागासवर्गीय (महिला)
३३खुला
३४खुला (महिला)
३५खुला (महिला)
३५खुला (महिला)
३६खुला (महिला)
३७खुला (महिला)
३८इतर मागासवर्गीय
३९खुला (महिला)
४0इतर मागासवर्गीय
४१खुला
४२इतर मागासवर्गीय (महिला)
४३खुला
४४खुला (महिला)
४५इतर मागासवर्गीय
४६इतर मागासवर्गीय (महिला)
४७खुला (महिला)
४८इतर मागासवगीर्य
४९खुला (महिला)
५0खुला
५१खुला
५२इतर मागासवर्गीय (महिला)
५३अनुसूचित जाती (महिला)
५४खुला
५५खुला (महिला)
५६खुला (महिला)
५७।खुला (महिला)
५८खुला
५९अनुसूचित जमाती (महिला)
६0खुला
६१खुला (महिला)
६२इतर मागासवर्गीय (महिला)
६३खुला (महिला)
६४खुला(महिला)
६५इतर मागासवर्गीय (महिला)
६६खुला (महिला)
६७इतर मागासवर्गीय (महिला)
६८खुला
६९खुला (महिला)
७०खुला (महिला)
७१खुला


के ईस्ट
प्रभाग आरक्षण
७२इतर मागासवर्गीय
७३खुला
७४खुला (महिला)
७५खुला (महिला)
७६इतर मागासवर्गीय
७७खुला
७८इतर मागासवर्गीय (महिला)
७९खुला
८०खुला
८१इतर मागासवर्गीय
८२खुला
८३खुला (महिला)
८४खुला
८५खुला
८६खुला (महिला)


टी
प्रभाग आरक्षण
१०३खुला
१०४इतर मागासवर्गीय
१०५खुला (महिला)
१०६खुला
१०७खुला (महिला)
१०८खुला


एस
प्रभाग आरक्षण
१०९खुला (महिला)
११०खुला (महिला)
१११खुला (महिला)
११२खुला (महिला)
११३खुला (महिला)
११४खुला
११५खुला

प्रभाग आरक्षण
११६खुला (महिला)
११७इतर मागासवर्गीय (महिला)
११८खुला
११९इतर मागासवर्गीय (महिला)
१२०खुला (महिला)
१२१अनुसूचित जाती (महिला)
१२२इतर मागासवर्ग (महिला)

एच वेस्ट
प्रभाग आरक्षण
९७खुला
९८खुला
९९अनुसूचित जमाती
१००इतर मागासवर्गीय (महिला)
१०१खुला
१०२खुला (महिला)

एन
प्रभाग आरक्षण
१२३खुला (महिला)
१२४खुला (महिला)
१२५खुला (महिला)
१२६इतर मागासवर्ग (महिला)
१२७खुला
१२८खुला (महिला)
१२९इतर मागसवर्ग
१३०खुला (महिला)
१३१खुला
१३२खुला
१३३खुला

एम ईस्ट
प्रभागआरक्षण
१३४खुला (महिला)
१३५खुला (महिला)
१३६खुला (महिला)
१३७इतर मागासवर्ग (महिला)
१३८खुला (महिला)
१३९खुला
१४०इतर मागासवर्ग (महिला)
१४१खुला
१४२अनुसूचित जाती (महिला)
१४३इतर मागासवर्ग (महिला)
१४४खुला (महिला)
१४५खुला
१४६अनुसूचित जाती
१४७इतर मागासवर्ग (महिला)
१४८खुला (महिला)

एच ईस्ट
प्रभाग आरक्षण
८७खुला
८८खुला
८९इतर मागासवर्गीय
९०इतर मागासवर्गीय (महिला)
९१इतर मागासवर्गीय

प्रभाग आरक्षण
९२खुला (महिला)
९३अनुसूचित जाती (महिला)
९४खुला (महिला)
९५खुला
९६खुला

एम वेस्ट
प्रभागआरक्षण
१४९खुला
१५०खुला
१५१खुला
१५२अनुसूचित जाती
१५३इतर मागासवर्ग
१५४खुला
१५५अनुसूचित जाती

एल
प्रभागआरक्षण
१५६खुला (महिला)
१५७इतर मागासवर्ग (महिला)
१५८इतर मागासवर्ग (महिला)
१५९खुुला
१६०खुला
१६१इतर मागासवर्ग
१६२इतर मागासवर्ग
१६३इतर मागासवर्ग
१६४खुला
१६५खुला
१६६खुला
१६७खुला (महिला)
१६८खुला (महिला)
१६९अनुसूचित जाती
१७०खुला
१७१इतर मागासवर्ग (महिला)

एफ नॉर्थ
प्रभागआरक्षण
१७२खुला
१७३अनुसूचित जाती
१७४खुला (महिला)
१७५इतर मागासवर्ग
१७६खुला
१७७खुला (महिला)
१७८खुला
१७९खुला
१८०इतर मागासवर्ग (महिला)
१८१इतर मागासवर्ग (महिला)


प्रभागआरक्षण
२२५अनुसूचित जाती (महिला)
२२६खुला (महिला)
२२७खुला

बी
प्रभागआरक्षण
२२३खुला (महिला)
२२४इतर मागासवर्ग (महिला)

सी
प्रभागआरक्षण
२२०खुला
२२१खुला
२२२इतर मागासवर्ग (महिला)

डी
प्रभागआरक्षण
२१४ खुला
२१५खुला (महिला)
२१६खुला (महिला)
२१७इतर मागासवर्ग
२१८इतर मागासवर्ग (महिला)
२१९इतर मागासवर्ग (महिला)


प्रभागआरक्षण
२०७खुला (महिला)
२०८ खुला
२०९खुला
२१०अनुसुचित जाती (महिला)
२११इतरमागासवर्ग
२१२खुला (महिला)
२१३खुला

एफ साऊथ
प्रभागआरक्षण
२०० अनुसूचित जाती (महिला)
२०१खुला(महिला)
२०२खुला (महिला)
२०३खुला (महिला)
२०४खुला
२०५खुला
२०६इतर मागासवर्ग

जी साऊथ
प्रभागआरक्षण
१९३इतर मागासवर्गीय
१९४खुला
१९५अनुसूचित जाती (पुरुष)
१९६खुला
१९७खुला
१९८अनुसूचित जाती (पुरुष)
१९९खुला (महिला)

जी नॉर्थ
प्रभागआरक्षण
१८२खुला
१८३इतर मागासवर्ग (महिला)
१८४खुला
१८५खुला
१८६इतर मागासवर्ग
१८७खुला (महिला)
१८८खुला (महिला)
१८९खुला (महिला)
१९०इतर मागासवर्ग (महिला)
१९१खुला (महिला)
१९२खुला(महिला)

Web Title: Now the councilors started the footpath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.