मुंबई : प्रभाग फेररचनेचा सोमवारी झटका बसल्यानंतर बिथरलेले नगरसेवक मंगळवारी अखेर भानावर येत कामाला लागले आहेत़ आपापल्या प्रभागाची सीमारेषा व आपले मतदार कुठे हे जाणून घेण्यासाठी त्यांची धावपळ सुरू झाली आहे़ त्याचबरोबर आपल्यापुढील पर्यायांची चाचपणीही अनेकांनी सुरू केली आहे़ त्यामुळे निवडणुकीचे बिगूल वाजण्यापूर्वीच सर्वपक्षीय नगरसेवकांची पायपीट सुरू झाल्याचे दिसून आले. पूर्वी आरक्षणातून प्रभाग सुटल्यानंतर नगरसेवक थेट प्रचाराला व आपल्या प्रभागातील विकासकामांचा बार उडवून देण्याच्या मागे लागत असत. मात्र प्रभाग फेररचनेने गेल्या पाच वर्षांच्या त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे़ प्रभाग फेररचनेत हक्काचा प्रभाग फुटल्यामुळे विकासकामांचा बार उडविणे म्हणजे तेथून निवडणूक लढविणाऱ्याची सोय करून देण्यासारखे होणार आहे़ त्यामुळे विद्यमान प्रभागातील नगरसेवकांचा उत्साह कमी झाला आहे़ याउलट फेररचनेत आलेल्या प्रभागाकडे सर्वांनी धाव घेण्यास सुरुवात केली आहे़काही नगरसेवकांचे प्रभाग फुटून ते तीन-चार प्रभागांत गेल्यामुळे नगरसेवक संभ्रमात आहेत. त्यामुळे आपला जास्त मतदार कुठे विभागला गेला आहे, याचा अभ्यास अनेकांनी सुरू केला आहे़ त्यानुसार निवडून येण्याची संधी अधिक असलेल्या प्रभागांमध्ये या नगरसेवकांनी चाचपणी सुरू केली आहे़ यासाठी कार्यकर्त्यांनाही कामाला लावण्यात आले आहे़ तर प्रभाग नवीन असल्याने इच्छुकांचाही सध्या गोंधळच उडाला आहे़ यामुळे सध्या तरी नगरसेवक व इच्छुक प्रचारापूर्वी आपल्या प्रभागांच्याच अभ्यासाला लागल्याचे चित्र आहे़ (प्रतिनिधी)बंडखोर वाढणारआरक्षण आणि फेररचनेमुळे एकाच प्रभागात एकाच पक्षाच्या दोन उमेदवारांच्या मतदारांची विभागाणी झाली आहे़ यामुळे तिकीट वाटपाच्या वेळी पक्षनेत्यांसमोर पेच निर्माण होणार आहे़ परिणामी मोठ्या प्रमाणात बंडखोरीही होण्याची शक्यता आहे़ आपल्या पसंतीच्या प्रभागाचे तिकीट मिळवण्यासाठी नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरू होणार आहे़दिग्गजांपुढे पर्यायस्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांचा सध्याचा प्रभाग राखीव आहे़ तरी त्यांनी यापूर्वी निवडणूक लढविलेला व सध्याच्या नवीन प्रभागाप्रमाणे ६८ क्रमांकाचा प्रभाग खुला झाला आहे़ तसेच जुना प्रभाग क्रमांक ६० मध्ये समाविष्ट झाल्याने या दोन्ही प्रभागांतून निवडणूक लढविण्याची संधी त्यांना आहे़ राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांना प्रभाग क्ऱ ११७ महिलांकरिता आरक्षित झाला आहे, तर भांडुप पश्चिम येथील प्रभाग क्ऱ ११४ व ११५ हे प्रभाग खुले झाले आहेत़ या प्रभागामध्ये पिसाळ यांनी २००७ मध्ये निवडणूक लढविली होती़ त्यामुळे या दोन्ही प्रभागांत त्यांना संधी आहे़ प्रभाग क्ऱ १११ मध्ये त्यांच्या पत्नीही निवडणूक लढविण्याची शक्यता आहे़ माजी नगरसेवकांनाही संधी : माजी नगरसेवक सुभाष सावंत, विश्वनाथ महाडेश्वर, मनोहर पांचाळ यांचे प्रभाग खुले झाले आहेत़ त्यामुळे त्यांच्या नगरसेवक पत्नींच्या जागी त्यांना निवडणूक लढविता येणार आहे. आरोग्य समितीच्या माजी अध्यक्षा शिवसेनेच्या विभागप्रमुख राजुल पटेल यांचा प्रभाग खुला झाल्यामुळे त्यांना पुन्हा संधी प्राप्त होण्याची शक्यता वाढली आहे. 88%८८ टक्के वॉर्डमध्ये प्रभागांच्या फेररचनेत बदल झाल्याने महापौरांपासून विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांची अवस्था ‘जोर का झटका धीरेसे लगा...’ अशी झाली आहे. तसेच आता प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यामुळे संबंधित दावेदारांना स्फूर्ती चढली आहे. आर नॉर्थ प्रभाग आरक्षण१खुला (महिला)२खुला३ खुला४ खुला (महिला)५ इतर मागास वर्ग६ इतर मागास वर्ग७ खुला (महिला)८ खुलाआर सेंट्रलप्रभाग आरक्षण९ इतर मागास वर्ग१० इतर मागास वर्ग११ खुला१२ खुला१३ खुला१४ खुला (महिला)१५ खुला१६ खुला (महिला)१७ खुला (महिला)१८ खुलाआर साऊथप्रभाग आरक्षण१९ खुला (महिला)२० खुला२१ इतर मागास वर्ग (महिला)२२ इतर मागास वर्ग (महिला)२३ खुला२४ खुला (महिला)२५ खुला (महिला)२६ अनुसुचित जाती (महिला)२७ इतर मागास वर्ग (महिला)२८ इतर मागास वर्ग२९ खुला३० खुला (महिला)पी नॉर्थप्रभाग आरक्षण३१इतर मागासवर्गीय३२इतर मागासवर्गीय (महिला)३३खुला ३४खुला (महिला)३५खुला (महिला)३५खुला (महिला)३६खुला (महिला)३७खुला (महिला)३८इतर मागासवर्गीय३९खुला (महिला)४0इतर मागासवर्गीय४१खुला४२इतर मागासवर्गीय (महिला)४३खुला४४खुला (महिला)४५इतर मागासवर्गीय४६इतर मागासवर्गीय (महिला)४७खुला (महिला)४८इतर मागासवगीर्य४९खुला (महिला)५0खुला५१खुला५२इतर मागासवर्गीय (महिला)५३अनुसूचित जाती (महिला)५४खुला५५खुला (महिला)५६खुला (महिला)५७।खुला (महिला)५८खुला५९अनुसूचित जमाती (महिला)६0खुला६१खुला (महिला)६२इतर मागासवर्गीय (महिला)६३खुला (महिला)६४खुला(महिला)६५इतर मागासवर्गीय (महिला)६६खुला (महिला)६७इतर मागासवर्गीय (महिला)६८खुला६९खुला (महिला)७०खुला (महिला)७१खुलाके ईस्टप्रभाग आरक्षण७२इतर मागासवर्गीय७३खुला७४खुला (महिला)७५खुला (महिला)७६इतर मागासवर्गीय७७खुला७८इतर मागासवर्गीय (महिला)७९खुला८०खुला८१इतर मागासवर्गीय८२खुला८३खुला (महिला)८४खुला८५खुला८६खुला (महिला)टीप्रभाग आरक्षण१०३खुला१०४इतर मागासवर्गीय१०५खुला (महिला)१०६खुला१०७खुला (महिला)१०८खुलाएसप्रभाग आरक्षण१०९खुला (महिला)११०खुला (महिला)१११खुला (महिला)११२खुला (महिला)११३खुला (महिला)११४खुला११५खुला प्रभाग आरक्षण११६खुला (महिला)११७इतर मागासवर्गीय (महिला)११८खुला११९इतर मागासवर्गीय (महिला)१२०खुला (महिला)१२१अनुसूचित जाती (महिला)१२२इतर मागासवर्ग (महिला)एच वेस्टप्रभाग आरक्षण९७खुला९८खुला९९अनुसूचित जमाती१००इतर मागासवर्गीय (महिला)१०१खुला१०२खुला (महिला)एन प्रभाग आरक्षण१२३खुला (महिला)१२४खुला (महिला)१२५खुला (महिला)१२६इतर मागासवर्ग (महिला)१२७खुला१२८खुला (महिला)१२९इतर मागसवर्ग१३०खुला (महिला)१३१खुला१३२खुला१३३खुलाएम ईस्टप्रभागआरक्षण१३४खुला (महिला)१३५खुला (महिला)१३६खुला (महिला)१३७इतर मागासवर्ग (महिला)१३८खुला (महिला)१३९खुला१४०इतर मागासवर्ग (महिला)१४१खुला१४२अनुसूचित जाती (महिला)१४३इतर मागासवर्ग (महिला)१४४खुला (महिला)१४५खुला१४६अनुसूचित जाती१४७इतर मागासवर्ग (महिला)१४८खुला (महिला)एच ईस्टप्रभाग आरक्षण८७खुला८८खुला८९इतर मागासवर्गीय९०इतर मागासवर्गीय (महिला)९१इतर मागासवर्गीय प्रभाग आरक्षण९२खुला (महिला)९३अनुसूचित जाती (महिला)९४खुला (महिला)९५खुला९६खुलाएम वेस्टप्रभागआरक्षण१४९खुला१५०खुला१५१खुला१५२अनुसूचित जाती१५३इतर मागासवर्ग१५४खुला१५५अनुसूचित जातीएलप्रभागआरक्षण१५६खुला (महिला)१५७इतर मागासवर्ग (महिला)१५८इतर मागासवर्ग (महिला)१५९खुुला१६०खुला१६१इतर मागासवर्ग१६२इतर मागासवर्ग१६३इतर मागासवर्ग१६४खुला१६५खुला१६६खुला१६७खुला (महिला)१६८खुला (महिला)१६९अनुसूचित जाती१७०खुला१७१इतर मागासवर्ग (महिला)एफ नॉर्थप्रभागआरक्षण१७२खुला१७३अनुसूचित जाती१७४खुला (महिला)१७५इतर मागासवर्ग१७६खुला१७७खुला (महिला)१७८खुला१७९खुला१८०इतर मागासवर्ग (महिला)१८१इतर मागासवर्ग (महिला)एप्रभागआरक्षण२२५अनुसूचित जाती (महिला)२२६खुला (महिला)२२७खुलाबीप्रभागआरक्षण२२३खुला (महिला)२२४इतर मागासवर्ग (महिला)सीप्रभागआरक्षण२२०खुला२२१खुला२२२इतर मागासवर्ग (महिला)डीप्रभागआरक्षण२१४ खुला२१५खुला (महिला)२१६खुला (महिला)२१७इतर मागासवर्ग२१८इतर मागासवर्ग (महिला)२१९इतर मागासवर्ग (महिला)ई प्रभागआरक्षण२०७खुला (महिला)२०८ खुला२०९खुला२१०अनुसुचित जाती (महिला)२११इतरमागासवर्ग२१२खुला (महिला)२१३खुला एफ साऊथप्रभागआरक्षण२०० अनुसूचित जाती (महिला)२०१खुला(महिला)२०२खुला (महिला)२०३खुला (महिला)२०४खुला२०५खुला२०६इतर मागासवर्गजी साऊथप्रभागआरक्षण१९३इतर मागासवर्गीय१९४खुला१९५अनुसूचित जाती (पुरुष)१९६खुला१९७खुला१९८अनुसूचित जाती (पुरुष)१९९खुला (महिला)जी नॉर्थप्रभागआरक्षण१८२खुला१८३इतर मागासवर्ग (महिला)१८४खुला१८५खुला१८६इतर मागासवर्ग१८७खुला (महिला)१८८खुला (महिला)१८९खुला (महिला)१९०इतर मागासवर्ग (महिला)१९१खुला (महिला)१९२खुला(महिला)
नगरसेवकांची आता पायपीट सुरू
By admin | Published: October 05, 2016 3:48 AM