आता मोबाइलवर अभ्यासक्रम

By admin | Published: September 13, 2015 04:38 AM2015-09-13T04:38:03+5:302015-09-13T04:38:03+5:30

दफ्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य शासन व महापालिका यांच्यात चढाओढ सुरू असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मोबाइलवर अभ्यासक्रम उपलब्ध करून

Now course on mobile | आता मोबाइलवर अभ्यासक्रम

आता मोबाइलवर अभ्यासक्रम

Next

मुंबई : दफ्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य शासन व महापालिका यांच्यात चढाओढ सुरू असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मोबाइलवर अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचे संकेत दिले आहेत़
दिंडोशी येथील एका कार्यक्रमात त्यांनी हे संकेत दिले़ ते म्हणाले, एका टॅबमध्ये वर्षभराचा अभ्यासक्रम राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आता
पुस्तकांचे ओझे पाठीवर घेऊन फिरावे लागणार नाही. आगामी काळात हा अभ्यासक्रम शिक्षक-पालकांच्या परवानगीने मोबाइलवरही उपलब्ध करून देता येईल़
या वेळी उद्धव ठाकरे यांनी पुढच्या वर्षी नववी व दहावीचा अभ्यासक्रमही टॅबमध्ये देणार असल्याची घोषणा केली़
शिवसेनेच्या सुवर्ण वर्षानिमित्त दिंडोशी विधानसभा क्षेत्राच्या वतीने खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते टॅबचे वाटप करण्यात आले़
या वेळी ते म्हणाले, विद्यार्थी हे राष्ट्राचे आधारस्तंभ असतात. भावी पिढी दफ्तराच्या ओझ्याखाली दबली तर कसे होणार! त्यामुळेच शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत़
सध्याच्या पिढीचा अधिकाधिक वेळ मोबाइलवर गेम खेळण्यात जातो़ त्यांना टॅबच्या माध्यमातून अभ्यासक्रम उपलब्ध करून दिल्याने मुले आवडीने अभ्यास करतील, अशी आशा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)

दुष्काळग्रस्तांसाठी पाच लाखांची मदत
विदर्भ-मराठवाडा दुष्काळामुळे होरपळत असल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची गंभीर दखल घेत दहीहंडी उत्सवातून जमा झालेला ५ लाख १ हजार रुपयांचा निधी शिवसेना दिंडोशीतील शाखांच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी देण्यात आला़ उद्धव ठाकरे यांना या रकमेचा धनादेश देण्यात आला़

Web Title: Now course on mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.