Join us

आता विनाशुल्क बदलता येणार विमान प्रवासाची तारीख अन् वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आता कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय देशांतर्गत विमान प्रवासाची तारीख आणि वेळ बदलता येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आता कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय देशांतर्गत विमान प्रवासाची तारीख आणि वेळ बदलता येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमी झालेली प्रवासी संख्या, सतत बदलणारे नियम आणि तिकीट रद्द करण्याचे वाढलेले प्रमाण रोखण्यासाठी काही विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीने विमान प्रवाशांच्या संख्येत जवळपास १५ टक्के घट झाली आहे. शिवाय विविध राज्यांत कठोर निर्बंध लागू करण्यात आल्याने बऱ्याच जणांनी प्रवास पुढे ढकलून तिकिटे रद्द केली. त्यामुळे विमान कंपन्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विमान कंपन्यांनी ही शक्कल लढविली आहे. प्रवासाची तारीख आणि वेळ बदलण्यासाठी आकारले जाणारे शुल्क माफ केल्यास तिकिटे रद्द करण्याचे प्रमाण कमी होईल. विविध राज्यांत लागू केलेल्या निर्बंधांमुळे प्रवासाबाबत साशंक असलेले नागरिक या सुविधेमुळे तिकीट बुकिंग करण्यात मागेपुढे पाहणार नाहीत, असा विश्वास कंपन्यांना आहे. काही विमान कंपन्यांनी १७ एप्रिल ते १५ मेपर्यंत, तर काहींनी ३० एप्रिलपर्यंत ही सवलत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

......................