महापालिकेच्या रुग्णालयातही आता ‘डिजिटल प्रिस्क्रिप्शन’; ‘एचएमआयएस’ प्रणाली सुरू होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 09:26 AM2024-05-29T09:26:03+5:302024-05-29T09:28:39+5:30

दीड वर्ष या महाविद्यालयातील सुद्धा एचएमआयएस प्रणाली बंद होती. मात्र ती आता पुन्हा नव्याने सुरू होत आहे.

Now 'Digital Prescription' in Municipal Hospital too; 'HMIS' system will start! | महापालिकेच्या रुग्णालयातही आता ‘डिजिटल प्रिस्क्रिप्शन’; ‘एचएमआयएस’ प्रणाली सुरू होणार!

महापालिकेच्या रुग्णालयातही आता ‘डिजिटल प्रिस्क्रिप्शन’; ‘एचएमआयएस’ प्रणाली सुरू होणार!

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई महापालिकेच्या मुख्य आणि अन्य रुग्णालयांत अद्यापही हाताने डिजिटल प्रिस्क्रिप्शन लिहिण्यात येते. आता त्यामध्ये बदल करून वर्षभरात महापालिकेच्या आरोग्य विभागात एचएमआयएस प्रणाली राबविण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला असून, त्याकरिता ३५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमानुसार, सर्व वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित रुग्णालयांमध्ये एचएमआयएस प्रणाली राबविणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या अखत्यारीत नायर, सायन, कूपर आणि केईएम रुग्णालयाशी संलग्न महाविद्यालयांचा समावेश आहे. त्या सोबत उपनगरीय रुग्णालये, विशेष रुग्णालये, प्रसूती गृह आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना यांचा समावेश आहे.    

राज्य शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या बहुतांश रुग्णालयात सुद्धा एचएमआयएस प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. दीड वर्ष या महाविद्यालयातील सुद्धा एचएमआयएस प्रणाली बंद होती. मात्र ती आता पुन्हा नव्याने सुरू होत आहे. 

  • ही असतात कामे- ओपीडी आणि अतितत्काळ विभागातील केस पेपर नोंदणी, रुग्णाचे उपचार केस पेपर, उपचारादरम्यान रुग्णालयात दाखल असताना केलेले उपचार,  तसेच डिस्चार्ज कार्डमध्ये भरावी लागणारी रुग्णाची सर्व  माहिती हाताने भरावी लागत आहे.



येत्या वर्षभरात महापालिकेच्या केवळ वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयातच नाही तर आरोग्य व्यवस्थेतील सर्व रुग्णालयात  एचएमआयएस प्रणाली राबविण्यात येणार आहे. याकरिता कामाचे आदेशही देण्यात आले आहे.
- डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त महापालिका आयुक्त

Web Title: Now 'Digital Prescription' in Municipal Hospital too; 'HMIS' system will start!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.