आता मिटणार सुक्या कचऱ्याचे टेन्शन, महापालिका उभारणार यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 02:33 AM2019-12-26T02:33:29+5:302019-12-26T02:34:15+5:30

महापालिका उभारणार यंत्रणा : घराघरांतून जमा होणार सुका कचरा

Now the dry waste tension, municipal building system will be erased | आता मिटणार सुक्या कचऱ्याचे टेन्शन, महापालिका उभारणार यंत्रणा

आता मिटणार सुक्या कचऱ्याचे टेन्शन, महापालिका उभारणार यंत्रणा

Next

मुंबई : पुनर्प्रक्रियेतून ओला कचºयाचा प्रश्न सुटतो आहे़ मात्र, दररोज जमा होणाºया सुका कचºयाने मोठी अडचण निर्माण केली आहे़ त्यामुळे आता मुंबईतील प्रत्येक घरातून सुका कचरा गोळा करून त्याचा पुनर्वापर अथवा विल्हेवाट लावण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे़ यासाठी शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे़

मुंबईवरील कचºयाचा ताण कमी करण्यासाठी महापालिकेने २ आॅक्टोबर, २०१७ पासून मोठ्या सोसायट्यांना कचºयाचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले आहे. ओला व सुक्या कचºयाचे वर्गीकरण करण्यास ८० टक्के मुंबईकरांनी सुरुवात केली आहे़, तर अनेक मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी आपल्या आवारातच ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे़ मात्र, घराघरातून जमा होणाºया घरातील टाकाऊ वस्तुंची विल्हेवाट लावणे अडचणीचे ठरत आहे़

देवनार डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपुष्टात आली आहे़ कांजूर मार्गचा एकमेव पर्याय असल्याने, मुंबईतील कचºयाचा भार कमी करणे अत्यंत गरजेचे आहे़ त्यामुळे पालिकेने सुक्या कचºयाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी घेतली आहे़ यासाठी शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरासाठी ़नियुक्त ठेकेदार दररोज घराघरातून सुका गोळा करून त्यावर प्रक्रिया करणार आहेत. दररोज किमान ५० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर असणार आहे़

आजची परिस्थिती
पालिकेच्या माध्यमातून ३८ सुका कचरा विलगीकरण केंद्रे सामाजिक संस्थांकडून सुरू करण्यात येत आहेत. संपूर्ण मुंबईतून ९६ टेम्पो सुका कचºयाचे संकलन करीत आहेत़, तरीही ओला-सुका कचरा एकत्र होण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे सुक्या कचºयाचे विलगीकरण आणि पुनर्वापर-पुनर्विक्री करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

प्रतिदिन अडीचशे मेट्रिक टनवर प्रक्रिया

च्शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी एक ठेकेदार नेमण्यात येणार आहे़ या ठेकेदारांमार्फत घराघरातून सुका कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे़ सुरुवातीला दररोज किमान ५० मेट्रिक टन ते २५० मेट्रिक टनांपर्यंत प्रक्रिया करता येणार आहे़ सुक्या कचºयाचे संकलन आणि वाहतूक करणे अशी संबंधित ठेकेदाराची जबाबदारी असणार आहे़
च् कचरा व्यवस्थापनासाठी मुंबईकरांना प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेने सवलत योजना आणली आहे़ यामध्ये कचºयाचे वर्गीकरण, ओल्या कचºयापासून खतनिर्मिती, सुक्या कचºयाची विल्हेवाट, रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना राबविणाºया सोसायट्यांना मालमत्ता करात पाच टक्के सवलत देण्याच्या योजनांचा समावेश आहे़

सध्या महापालिकेकडे कचरा वाहतुकीसाठी 2118 वाहने आहेत. आणखी 70 वाहने कमी करण्याचे महापालिकेचे लक्ष्य आहे.

कचरा वेगळा करण्यास ३६ यंत्रे
च् सुक्या कचºयातही प्लास्टीक, कागद, काच असे वर्गीकरण करून, त्या वस्तुंची विक्री करण्यात येणार आहे. सुका कचरा वेगळा करण्यासाठी ३६ यंत्रे सध्या महापालिकेकडे आहेत.
च्मुंबईत दररोज साडेनऊ हजार मेट्रिक टन कचरा जमा होत होता. गेल्या वर्षभरात हे प्रमाण सात हजार मेट्रिक टनावर आणण्यात महापालिकेला यश आले आहे.
च्सध्या संपूर्ण मुंबईतून ९६ टेम्पो सुका कचºयाचे संकलन केला जात आहे.

Web Title: Now the dry waste tension, municipal building system will be erased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.