Join us

आता महिलांच्या हाती रेल्वेचे सारथ्य; आशियातील पहिल्या रेल्वे मोटरवुमन म्हणून सुरेखा यादव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2020 12:48 AM

माथेरानची राणी म्हणून ओळखली जाणारी नेरळ-माथेरान मिनी ट्रेन चालविणाऱ्या पहिल्या महिला असिस्टंट लोको पायलट शुभांगी खोब्रागडे आहेत.

कुलदीप घायवटमुंबई : पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आघाडीचे स्थान पटकावले आहे. महिला काही करू शकत नाहीत, या विचाराला छेद देऊन महिलांनी उच्चपद गाठले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, आशियातील पहिल्या रेल्वे मोटरवुमनने आणखी मोटरवुमनची टीम तयार केली आहे. त्यामुळे रेल्वेचे सारथ्य महिलांच्या हाती आले आहे.

आशियातील पहिल्या रेल्वे मोटरवुमन म्हणून सुरेखा यादव यांनी आपले नाव कोरले आहे. रेल्वेसेवेमध्ये त्यांची ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत. डेक्कन क्वीन, महिला विशेष लोकल याचे सारथ्य त्यांच्या हाती होते. सध्या त्या कल्याण येथील मोटरमन केंद्रात भावी मोटरमनला प्रशिक्षण देत आहेत. १६ महिलांना लोको पायलटचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती सुरेखा यादव यांनी दिली.

मध्य रेल्वे मार्गावरील पहिली एसी लोकल चालविण्याचा मान मोटरवुमन मनीषा म्हस्के यांना मिळाला आहे. २००२ ते २०११ पर्यंत असिस्टंट लोको पायलट म्हणून मालगाडीवर काम केले. त्यानंतर, मालगाडीवर लोको पायलट म्हणून रुजू झाले. लोणावळा ते पुणे, पनवेल ते कल्याण या मार्गावर मनीषा यांनी मालगाडी चालविली आहे. वरिष्ठांनी पहिली एसी लोकल चालविण्याची संधी दिल्याने खूप अभिमानास्पद वाटते. आता सध्या हार्बर मार्गावर लोकल चालवित आहे, अशी माहिती मनीषा यांनी दिली.

माथेरानची राणी म्हणून ओळखली जाणारी नेरळ-माथेरान मिनी ट्रेन चालविणाऱ्या पहिल्या महिला असिस्टंट लोको पायलट शुभांगी खोब्रागडे आहेत. खोब्रागडे मागील ८ वर्षांपासून रेल्वेच्या सेवेत कार्यरत आहेत. मागील १२ वर्षांपासून रेल्वेमध्ये टेक्निशियन म्हणून काम करत आहे. एप्रिल, २०१९ मध्ये लोको पायलट पदाची परीक्षा दिली. ती परीक्षा पास होऊन आता लोको पायलट म्हणून सेल्वी नाडार काम करत आहेत. सीएसएमटी येथे आलेल्या एक्स्प्रेसचे इंजिन एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी नेण्याचे काम केले जाते.पहिल्या महिला टेक्निशियनमाटुंगा वर्कशॉपमध्ये टेक्निशयन म्हणून रजनी कोरे काम करत आहेत. पतीचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी सुरुवातीला रेल्वेमध्ये खलाशी म्हणून नोकरी केली. मात्र, हळूहळू प्रत्येक गोष्ट कोरे शिकत गेल्या. त्यामुळे मागील १० वर्षांपासून टेक्निशियन म्हणून कोरे काम करत आहेत. या क्षेत्रात पुरुष कर्मचारीच काम करत होते. कोरे यांनी याला छेद देऊन या क्षेत्रात नाव कोरले. कोरे यांना रेल्वेमध्ये २४ वर्षे पूर्ण झाली आहेत.

टॅग्स :रेल्वे