बेकायदा पार्किंगसाठी आता चार हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 05:49 AM2020-01-08T05:49:27+5:302020-01-08T05:49:34+5:30

अनधिकृत पार्किंगसाठी थेट दहा हजार रुपये दंड आकारण्यास मुंबई वाहतूक प्राधिकरणाने आक्षेप घेतल्यानंतर अखेर ही रक्कम कमी करण्यात आली आहे़

Now a fine of four thousand for illegal parking | बेकायदा पार्किंगसाठी आता चार हजारांचा दंड

बेकायदा पार्किंगसाठी आता चार हजारांचा दंड

Next

मुंबई : अनधिकृत पार्किंगसाठी थेट दहा हजार रुपये दंड आकारण्यास मुंबई वाहतूक प्राधिकरणाने आक्षेप घेतल्यानंतर अखेर ही रक्कम कमी करण्यात आली आहे़ त्यानुसार सार्वजनिक वाहनतळाच्या पाचशे मीटर परिसरात अनधिकृतपणे वाहन उभे केल्यास चार हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे़ तर नो पार्किंग झोन म्हणून जाहीर केलेल्या पाच रस्त्यांवर दंडाची रक्कम आठ हजार रुपये असणार आहे़ याबाबतचे परिपत्रक नुकतेच पालिका प्रशासनाने काढले आहे़
रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे मुंबईत वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती़ अशा बेकायदेशीर पार्किंगवर निर्बंध येण्यासाठी ७ जुलै २०१९ पासून पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरू केली़ त्यानुसार सार्वजनिक वाहनतळांच्या पाचशे मीटर परिसरात उभ्या करण्यात आलेल्या वाहनांकडून पाच हजार ते २३ हजार २५० रुपये दंड वसूल करण्यास सुरुवात झाली़ मात्र या कारवाईला नागरिकांकडून तीव्र विरोध होऊ लागला़
मुंबई वाहतूक प्राधिकरणाच्या सदस्यांनीही दंडाच्या रकमेत कपात करण्याची सूचना ३ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत केली होती़ त्याप्रमाणे अनधिकृत पार्किंगमधील दंडाची सुधारित रक्कम पार्किंग दराच्या ४० पट म्हणजे चार हजार रुपये असणार आहे़ बसथांब्यासमोर गाड्या उभ्या करणाऱ्यांनाही हा दंड लागू असणार आहे़ म्हणजे पार्किंगचा दर शंभर रुपये असेल तर अनधिकृत पार्किंगसाठी चार हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे़
>अनधिकृत पार्किंगच्या दंडाचे सध्याचे दर - मोटारसायकल - पाच हजार रुपये, चारचाकी दहा हजार रुपये, ट्रक १५ हजार एवढे वसूल करण्यात येतात़ दंड वाढून ही रक्कम २३ हजार २५० पर्यंतही काही वेळा पोहोचते़
मुंबईत १४६ सार्वजनिक वाहनतळ आहेत़ यामध्ये ३४ हजार ८०८ दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी राहतील, एवढी जागा आहे.
>वर्दळीच्या मार्गावर दंड अधिक
वर्दळीचे मार्ग असलेले एम.के. रोड, एस.व्ही. रोड, एलबीएस मार्ग, न्यू लिंक रोड या चार महत्त्वाच्या रस्त्यांसाठी अनधिकृत पार्किंगसाठी आकारण्यात येणारे दंड जास्त असणार आहेत. मात्र सर्वपक्षीय नगरसेवकांनी या परिपत्रकाला विरोध दर्शवला आहे. निवडणूक कालावधीत प्रशासनाने पार्किंगचे धोरण निश्चित केले. त्या वेळेस नगरसेवकांनी दर कमी करण्याचे पत्रही दिले आहे़
>महत्त्वाचे चार रस्ते वगळता मुंबईतील अन्य भागांसाठीचे दर
आधीचा दंड सुधारित दंड
दुचाकी पाच हजार १८००
तीन-चार चाकी १० हजार चार हजार
आॅटो, टॅक्सी आठ हजार चार हजार
सार्वजनिक वाहतूक बस ११ हजार सात हजार
ट्रक १५ हजार १० हजार
>एम.के. रोड, एस.व्ही. रोड, एलबीएस मार्ग, न्यू लिंक रोड या चार महत्त्वाच्या रस्त्यांसाठीचा दर
आधीचा दंड सुधारित दंड
दुचाकी ५ हजार ३ हजार ४००
तीन-चार चाकी १० हजार ८ हजार
आॅटो, टॅक्सी ८ हजार ४ हजार
सार्वजनिक वाहतूक बस १४ हजार ७ हजार
ट्रक १९ हजार ८०० १० हजार

Web Title: Now a fine of four thousand for illegal parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.