Join us

आता उद्याने, मैदाने, चौपाट्याही खुल्या होणार, सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 7:11 AM

Mumbai : कोविडच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेवर नियंत्रण आल्यानंतर मिशन ब्रेक दी चेन अंतर्गत पालिकेमार्फत टप्प्याटप्प्याने उपाययोजना करून जनजीवन पूर्ववत खुले केले जात आहे.

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार नियंत्रणात आला असल्याने रविवारपासून दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी रेल्वे प्रवास सुरू करण्यात आला. आता मुंबईतील उद्याने, मैदाने, चौपाट्या आणि समुद्रकिनारे सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहेत. मात्र या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतर याचे पालन करावे लागणार आहे.कोविडच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेवर नियंत्रण आल्यानंतर मिशन ब्रेक दी चेन अंतर्गत पालिकेमार्फत टप्प्याटप्प्याने उपाययोजना करून जनजीवन पूर्ववत खुले केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून ८६० उद्याने, ३१८ मैदाने, चौपाट्या आणि समुद्र-किनारे सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत खुले राहतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली.

या नियमांचे पालन बंधनकारक....मात्र सार्वजनिक ठिकाणे सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली तरी तोंडाला मास्क लावणे अनिवार्य असणार आहे. तसेच गर्दी न करता सुरक्षित अंतर राखणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोरोनाचा संसर्ग सध्या नियंत्रणात असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे जंतुनाशक द्रव्य किंवा साबण आणि पाण्याने हातांची नियमित स्वच्छता राखावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. मात्र कोविड प्रतिबंधक निर्देशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई