आता होणार चिखलफेक

By admin | Published: May 13, 2016 03:06 AM2016-05-13T03:06:57+5:302016-05-13T03:06:57+5:30

नालेसफाईवरून यंदाही राजकीय चिखलफेकीला सुरुवात झाली आहे़ विशेष म्हणजे, मित्रपक्ष भाजपानेच यात उडी घेतल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत़

Now get rid of muck | आता होणार चिखलफेक

आता होणार चिखलफेक

Next

मुंबई : नालेसफाईवरून यंदाही राजकीय चिखलफेकीला सुरुवात झाली आहे़ विशेष म्हणजे, मित्रपक्ष भाजपानेच यात उडी घेतल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत़, तर राष्ट्रवादीने नाल्यांमधील गाळच शिवसेना भाजपा नेत्यांच्या घरासमोर फेकण्यात येईल, असा जाहीर इशारा दिला आहे़
नालेसफाईच्या घोटाळ्यामुळे ठेकेदारांवर कारवाई झाल्यानंतर नवीन ठेकेदार मिळणे पालिकेसाठी अवघड झाले आहे़ त्यामुळे विभाग स्तरावरील नाल्यांची सफाई कामगार व बिगर शासकीय संस्थांच्या मदतीने सुरू आहे, तर मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम संथगतीने सुरू आहे़ ही कामे ठरलेल्या डेडलाइनपर्यंत पूर्ण करण्याची ताकीद आयुक्त अजय मेहता यांनी यापूर्वीच दिली आहे़
मात्र, शहर भागातील नालेसफाईचे कंत्राट अद्याप देण्यात आलेले नाही़ हा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये बुधवारी फेटाळण्यात आला़ त्यामुळे नाल्यांची सफाई दोन दिवसांत सुरू न झाल्यास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाल्यात उतरून गाळ काढतील़ हाच गाळ शिवसेना व भाजपा नेत्यांच्या घरासमोर फेकण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिला आहे़
यावर भाजपाची हरकत
साउथ एव्हेन्यू पीएनटी या नाल्याच्या सफाईच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही़ गझदरबंद येथे उभारण्यात येणाऱ्या पम्पिंग स्टेशनच्या कामासाठी समुद्राचा प्रवाह अडविणारी बंद वॉल बांधण्यात आली आहे़ या वॉलला पाथमुख बांधण्याचे काम ३१ मे पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे़ हे काम पूर्ण न झाल्यास नाल्यातून येणाऱ्या पाण्याचा निचरा होणार नाही़ त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरेल़ नाल्यांच्या संरक्षण भिंती व पाथमुखाजवळ काही झोपड्या व अतिक्रमणे
झाली असल्याने पाण्याचा निचरा होणार नाही़

Web Title: Now get rid of muck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.