सर्व महिला पोलिसांना आता ८ तास ड्युटी द्या - आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 09:33 AM2022-01-29T09:33:35+5:302022-01-29T09:34:14+5:30

पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा आदेश

Now give 8 hours duty to all women police, sanjay pande | सर्व महिला पोलिसांना आता ८ तास ड्युटी द्या - आदेश

सर्व महिला पोलिसांना आता ८ तास ड्युटी द्या - आदेश

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांच्या कामाचे तास १२ तासांवरून ८ तासांवर आणण्याचा निर्णय सप्टेंबरमध्ये घेतला. त्यानुसार काही ठिकाणी अंमलबजावणी करण्यात येत असून, सगळीकडे प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे. 

नागपूर शहरात महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर आठ तास ड्यूटीचा उपक्रम सुरू केल्यानंतर पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस घटकांनी या निर्णयाबाबत विचार करावा, अशी सूचना केली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनीही महिला पोलिसांसाठी आठ तासांची ड्यूटी जाहीर केली होती, त्यापाठोपाठ असा निर्णय घेऊन अमरावती आणि नुकतीच नवी मुंबई पोलिसांनीही अंमलबजावणी केली. अखेर राज्य पातळीवर निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील महिला पोलिसांना ८ तासांची ड्यूटी करायला मिळणार आहे.

ताण वाढल्याची दखल
n पोलीस दलात कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलिसांवर कामाबरोबरच कौटुंबीक जबाबदारीचा भारही आहे. 
n  सण-उत्सव बंदोबस्त, गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरातून अनेक वेळा १२ तासांपेक्षा जास्त वेळ कर्तव्य बजावतात.  त्यामुळे त्यांच्या कौटुंबीक जबाबदारीवर आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मानसिक ताण वाढत आहे. 
n काही महिला पोलिसांनीही ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार, सगळीकडे पुढील आदेश मिळेपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर यांची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला आहे.

Web Title: Now give 8 hours duty to all women police, sanjay pande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.