आता फेरीवाल्यांना एक्स्प्रेस, लोकलचा पास; अधिकृत फेरीवाले नियुक्तीचा ‘मरे’चा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 09:27 AM2023-11-13T09:27:00+5:302023-11-13T09:27:15+5:30

मध्य रेल्वेला महसूलसुद्धा मिळणार आहेत.

Now hawkers pass express, local; central railway decision to appoint official hawkers | आता फेरीवाल्यांना एक्स्प्रेस, लोकलचा पास; अधिकृत फेरीवाले नियुक्तीचा ‘मरे’चा निर्णय

आता फेरीवाल्यांना एक्स्प्रेस, लोकलचा पास; अधिकृत फेरीवाले नियुक्तीचा ‘मरे’चा निर्णय

मुंबई  : धावत्या मेल-एक्स्प्रेससह उपनगरीय लोकल गाड्या अधिकृत फेरीवाले नियुक्त करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेने निविदासुद्धा मागविण्यात आल्या आहे. ५०० मेल- एक्स्प्रेस ते उपनगरीय लोकल सेवा १५०० असे एकूण दोन हजार रेल्वे गाड्यात तीन वर्षांसाठी सामना आणि खाद्यपदार्थ विक्रीचे कंत्राट देण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेला महसूलसुद्धा मिळणार आहेत.

उपनगरीय लोकल सेवा आणि मेल- एक्स्प्रेस गाड्यात बेकायदेशीर फेरीवाल्यांची संख्या वाढल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून येत होत्या. त्यामुळे आता मध्य रेल्वेने या बेकायदेशीर फेरीवाल्यांना आळा घालण्यासाठी त्यांच्या जागी अधिकृत फेरीवाल्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. मध्य रेल्वेने सर्व मेल/एक्स्प्रेस आणि पॅसेंजर ट्रेन्सच्या (महानगरी एक्स्प्रेस, राजधानी, दुरांतो व इतर प्रीमियम ट्रेन्स वगळता) सर्व ट्रेन्समध्ये विविध वस्तूंचे व खाद्यपदार्थ विक्री करण्यासाठी ई- निविदा काढल्या आहेत. 

विशेष म्हणजे मध्य रेल्वेने एसी आणि नॉन एसी लोकल गाड्यात आणि माथेरान हेरिटेज ट्रेनच्या सर्व ट्रेनमधील सर्व श्रेणींचा डब्यात उपभोग्य आणि गैर उपभोग्य वस्तूंची विक्री करता येणार आहे. परवानाधारक विक्रेत्यांना ५०० मेल/ एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्या आणि १५०० उपनगरीय लोकल सामना विक्रीची परवानगी दिली जाईल. परवानाधारकांना प्रवासाशी संबंधित उत्पादने, मोबाईल, लॅपटॉप उपकरणे, स्टेशनरी उत्पादने, वृत्तपत्र/मासिके/पुस्तके, इत्यादी आणि पॅक केलेले अन्न, पेय पदार्थ, स्नॅक आयटम, पॅकबंद विक्री करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

Web Title: Now hawkers pass express, local; central railway decision to appoint official hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.