Join us  

मुंबईदर्शन आता हेलिकॉप्टरमधून

By admin | Published: January 08, 2016 2:55 AM

हेलिकॉप्टरमधून मुंबईचे दर्शन घ्यायचे आहे... तर दहा मिनिटांसाठी मोजा ३,२00 रुपये... परदेशी पर्यटकांबरोबरच मुंबईकरांनाही हेलिकॉप्टरमधून मुंबईदर्शन घडावे

मुंबई : हेलिकॉप्टरमधून मुंबईचे दर्शन घ्यायचे आहे... तर दहा मिनिटांसाठी मोजा ३,२00 रुपये... परदेशी पर्यटकांबरोबरच मुंबईकरांनाही हेलिकॉप्टरमधून मुंबईदर्शन घडावे यासाठी हेलि टूरिझमची कल्पना एमटीडीसीने (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) आखली आहे. त्याचा शुभारंभ जुहू येथे गुरुवारी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांच्या हस्ते करण्यात आला. एमटीडीसी आणि पवनहंस यांच्या संयुक्त विद्यमाने हेलिकॉप्टरमधून पर्यटकांना मुंबईदर्शन घडणार आहे.मुंबईचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र येणाऱ्या पर्यटकांसाठी मुंबईचे हेलिकॉप्टरमधून दर्शन घेण्याची सुविधा नाही. हे पाहता एमटीडीसीने पर्यटकांना हेलिकॉप्टरमधून दर्शन घडवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पवनहंस आणि एमटीडीसीने हा उपक्रम आखला. त्याची सुरुवात जुहू एअरोड्रोमवरून करण्यात आली. पर्यटकांसाठी येथे पवनहंसतर्फे एक हेलिकॉप्टर उपलब्ध करण्यात आले असून, प्रत्येक प्रवाशामागे ३,२00 रुपये आकारणी केली जाईल. (प्रतिनिधी)महाराष्ट्राच्या दृष्टीने हा सर्वांत महत्त्वाचा दिवस आहे. मुंबईसारख्या शहरात अशी सेवा सुरू करणे हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. या सेवेचा जास्तीतजास्त पर्यटकांनी आणि खासकरून मुंबईकरांनी लाभ घेतला पाहिजे. - स्वाधीन क्षत्रिय (मुख्य सचिव : महाराष्ट्र राज्य)एमटीडीसी आणि पवनहंसचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मुंबईकरांना तसेच परदेशी पर्यटकांना मुंबईचे दर्शन हेलिकॉप्टरमधून घडेल ही आनंदाची गोष्ट आहे. यात आणखी काही ठिकाणांचा समावेश केला जाईल. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील पर्यटनाला गतीही देण्यात येईल.- पराग जैन नैनुटिया (व्यवस्थापकीय संचालक : एमटीडीसी)04पर्यटकांना बसण्याची क्षमता असलेले हॅलिकॉप्टर दहा मिनिटांची सफर घडवणार आहे. मुंबईदर्शन घडवताना वर्सोवा, मढ आयलंड, फिल्मसिटीसह अन्य स्थळांचे दर्शन पर्यटकांना हेलिकॉप्टरमधून घडेल. उत्तर आणि दक्षिण भागातील काही पर्यटनस्थळे या हेलिकॉप्टरमधून दाखविली जातील. या हेलिकॉप्टरचे बुकिंग एमटीडीसीच्या कार्यालयांमध्ये तसेच आरक्षण सेंटर्सवर केले जाईल, अशी माहिती एमटीडीसीकडून देण्यात आली.