Join us

आता हॉटेलमध्येच ‘चेक इन’ची सुविधा, देशातील प्रथम प्रयोग मुंबई विमानतळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 3:02 AM

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता ‘चेक इन’साठी विमानतळावर रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. कारण शहरातील सहा पंचतारांकित हॉटेलमधून ‘चेक इन’ करणे प्रवाशांना आता शक्य होणार आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता ‘चेक इन’साठी विमानतळावर रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. कारण शहरातील सहा पंचतारांकित हॉटेलमधून ‘चेक इन’ करणे प्रवाशांना आता शक्य होणार आहे. आॅटोमेटेड ‘चेक इन’ सुविधा असणारे देशातील पहिले टर्मिनल बनण्याचा मान ‘टर्मिनल १’ला मिळाला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाने अत्याधुनिक सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला आहे.सध्या विमानप्रवास करणा-या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने, विमानतळावर ‘चेक इन’साठी व बॅगेजसाठी मोठ्या रांगा असल्याचे चित्र दिसते. हे चित्र बदलण्याचा प्रयत्न या सुविधेच्या माध्यमातून केला जात आहे. या सेवेमुळे प्रवाशांना विमानतळावर सामान घेऊन रांगेत उभे राहावे लागणार नाही. सध्या ६ पंचतारांकित हॉटेलच्या माध्यमातून ही सेवा देण्यात आली असून, लवकरच त्यामध्ये आणखी पाच हॉटेल्सचा समावेश करण्यात येईल, अशी माहिती मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड या कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली. या सुविधेमुळे प्रवाशांचा त्रास कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सध्याच्या सहा हॉटेल्सपैकी तीन हॉटेल्स विमानतळाच्या जवळच आहेत. टर्मिनल १ द्वारे सेवा देणाºया सर्व विमान कंपन्यांकडे सेल्फ-बॅग ड्रॉप सुविधा ( एसबीडी) उपलब्ध होईल. त्याद्वारे बोर्डिंग पास मिळेल व बॅगेला टॅग लावून मिळेल. त्यानंतर, प्रवासी विमानतळावर गेल्यावर फास्ट बॅग ड्रॉप काउंटरवर जाऊन सुरक्षा तपासणी केल्यावर ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

टॅग्स :मुंबई