आता २०० लोकांच्या उपस्थितीत होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:07 AM2021-08-17T04:07:32+5:302021-08-17T04:07:32+5:30

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात येत असल्याने, आता लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये सरकारने सूट दिली आहे. यामुळे आता दुकाने, शॉपिंग मॉल ...

Now let's go in the presence of 200 people. Good luck! | आता २०० लोकांच्या उपस्थितीत होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान!

आता २०० लोकांच्या उपस्थितीत होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान!

Next

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात येत असल्याने, आता लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये सरकारने सूट दिली आहे. यामुळे आता दुकाने, शॉपिंग मॉल आठवड्याचे सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. यासोबतच आता मंगल कार्यालय व खुल्या लॉनमध्येही पाहुणे मंडळी जमविण्यास काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. मंगल कार्यालयाच्या ५० टक्के म्हणजेच जास्तीतजास्त १०० जण तर खुल्या लॉनमध्ये २०० जणांच्या उपस्थितीत आता लग्न करता येणार आहे. त्यामुळे लग्न घरातील सदस्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे इतके दिवस लग्न कार्यालयांवर अवलंबून असणारे हॉल, रिसॉर्ट, कॅटरिंग, मंडप डेकोरेटर्स व बँड व्यावसायिकांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

लग्न समारंभासाठी या आहेत अटी

मंगल कार्यालय - हॉल किंवा मंगल कार्यालयातील लग्न सोहळ्यांसाठी मंगल कार्यालयाच्या ५० टक्के क्षमतेने पाहुणे जमविण्यास परवानगी आहे किंवा जास्तीतजास्त शंभर जणांच्या उपस्थितीत कोरोनाचे सर्व नियम पाळून लग्न करण्यासाठी परवानगी आहे.

लॉन-खुले पटांगण अथवा लॉनमध्ये दोनशे जणांच्या उपस्थितीत कोरोनाचे सर्व नियम पाळून लग्न करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

लग्नाच्या तारखा

२०२१ मध्ये जानेवारी ते जुलैच्या दरम्यान लग्नाचे अनेक मुहूर्त होते. त्यानंतर, ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात लग्नाचा कोणताच मुहूर्त नसल्याचे सांगण्यात येत आहे. नोव्हेंबरपासून मुख्यतः दिवाळीनंतर लग्नाचा धूमधडाका पुन्हा एकदा सुरू होऊ शकतो.

मंगल कार्यालयांमध्ये उत्साह

सुरेंद्र बनकर (साई लीला हॉल) - या आधी अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळे पार पडत असल्याने, कोणीच हॉलचे बुकिंग करत नव्हते. आता सरकारच्या या निर्णयामुळे मंगल कार्यालय व हॉलच्या व्यवसायाला पुन्हा एकदा चालना मिळणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळले जातील, याची आम्ही पूर्णतः दक्षता घेत आहोत.

हिरालाल शाह (मंगल कार्यालय व्यावसायिक) - दोनशे जणांच्या उपस्थित लग्नाची परवानगी दिल्याने, व्यावसायिक व लग्न घरची मंडळी असे दोघेही आनंदी आहेत. आपल्या नातेवाइकांच्या उपस्थितीत लग्न पार पडत असल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

बॅण्डवालेही जोरात

अर्जुन धुमाळ (श्री ब्रास बँड) - सर्व सण व उत्सवांवर निर्बंध लादले गेल्याने, आमचा व्यवसाय मागील दोन वर्षे ठप्प होता. आता कोरोनाच्या निर्बंधांमध्ये सूट दिल्याने आमच्या व्यवसायालाही चालना मिळत आहे. आता गणपती, नवरात्री व लग्नांमध्ये आमचा व्यवसाय जोर धरेल, अशी आशा आहे.

Web Title: Now let's go in the presence of 200 people. Good luck!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.