Join us

नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी आता महारेराचे हेल्पलाईन नंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:10 AM

मुंबई : नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी महारेरातर्फे सिटिझन कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. यामध्ये महारेराच्या हेल्पलाइनवर संपर्क साधून घर ...

मुंबई : नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी महारेरातर्फे सिटिझन कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. यामध्ये महारेराच्या हेल्पलाइनवर संपर्क साधून घर खरेदीदार आपल्या मालमत्ता खरेदी व विक्रीविषयी असणाऱ्या समस्यांचे निराकरण करू शकतत. घर खरेदीदारांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी महारेराच्या वतीने त्यांच्या संकेतस्थळावर सुविधा करण्यात आली आहे. यामध्ये महारेराच्या वतीने नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येते. परंतु, तरीदेखील नागरिकांना रेरासंबंधी समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आला आहे. महारेराने नुकत्याच आपल्या परिपत्रकात याची माहिती दिली आहे.

परिपत्रकानुसार नागरिकांसाठी महारेराची प्रकल्प नोंदणी, एजंट नोंदणी, तक्रार निवारण, प्रकल्प मुदतवाढ व प्रकल्प सुधार यासाठी डिजिटल सुविधा उपलब्ध आहे. मात्र, अनेकांना या संदर्भात काही समस्या असतात त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महारेराने सिटीझन हेल्पलाईन जारी केली आहे. ही हेल्पलाईन सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे. रविवारी व सुट्ट्यांच्या दिवशी हेल्पलाईन बंद असणार आहे.

हेल्पलाईन क्रमांक

१८००२१०३७७० टोल फ्री

०२२-६९१५७१०० पीआरआय लाईन