- चेतन ननावरेमुंबई - कोणत्याही गृह प्रकल्पातील विक्री झालेल्या व खरेदीसाठी उपलब्ध असलेल्या घरांची नोंदणी यापुढे महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या (महारेरा) संकेतस्थळावर दिसणार आहे. त्यामुळे राज्यातील घर खरेदीसाठी फिरणाऱ्या ग्राहकांना घरबसल्या बुकिंग करता येणार आहे. महारेराचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांनी ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली.चॅटर्जी म्हणाले, येत्या एक ते दीड महिन्यात हा पर्याय ग्राहकांना महारेराच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. यामध्ये विकासकांना गृह प्रकल्पात घरांची संख्या नमूद करावी लागेल. सोबतच प्रकल्पातील विक्री झालेल्या व विक्रीसाठी उपलब्ध घरांची आकडेवारीही दाखवावी लागेल. त्यामुळे ग्राहकांना घरबसल्या कोणत्या प्रकल्पात किती घरे उपलब्ध आहेत, याची कल्पना येईल.किती घरांची विक्री झाली व किती घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत, याची माहिती मिळणार असल्यामुळे घरांच्या किमतीचा वाढणारा फुगा तसेच ग्राहकांची दिशाभूल टाळता येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.(‘महारेरा’च्या वर्षपूर्तीनिमित्तप्राधिकरणाचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांची सविस्तर मुलाखत उद्याच्या अंकात.)ग्राहकांची दिशाभूल होणार नाहीगृहखरेदीमध्ये मधल्या व्यक्तीकडून किंवा विकासकाकडून प्रकल्पातील सर्व घरांची विक्री झाल्याची खोटी माहिती दिली जाते. यामुळे ग्राहकांची दिशाभूल होते. आता तशा प्रकारांना आळा बसणार आहे.मुंबईसह राज्यात २९३ अनधिकृत गृहप्रकल्प;महारेराने उगारला कारवाईचा बडगामुंबईसह राज्यात तब्बल २९३ अनधिकृत गृहप्रकल्पांचे काम सुरू असल्याची माहिती महारेरासमोर आली आहे. याची दखल घेत या गृहप्रकल्पांविरोधात कारवाई करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
आता घरबसल्या करा घरांचे बुकिंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 6:09 AM