Join us

आता मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्रामात सशुल्क प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 1:18 AM

मनपा शाळा सहलींसाठी नि:शुल्क प्रवेश, तर खासगी शाळा सहलींना सवलत, प्रवेश शुल्क निधीचा उपयोग सेवा-सुविधा व परिरक्षणास

मुंबई : जोगेश्वरी पूर्व परिसरातील पूनम नगरमध्ये असलेले मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम प्रवेश सशुल्क करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे महापालिका प्रशासनाने सादर केला आहे. या शुल्कातून प्राप्त होणाऱ्या निधीचा उपयोग शिल्पग्रामात येणाºया अभ्यागतांना सोयी-सुविधा देणे, शिल्पग्रामाचे परिरक्षण या बाबींसाठी करण्यात येणार आहे.

प्रस्तावानुसार ३ वर्षांपर्यंत वय असणाºया बालकांसाठी नि:शुल्क प्रवेश असेल, तर ३ ते १२ वयोगटामधील व्यक्तीसाठी ५ रुपये शुल्क प्रस्तावित करण्यात आले आहे. १२ वर्षांवरील व्यक्तीसाठी २५ रुपये शुल्क प्रस्तावित करण्यात आले आहे. सहलीसाठी येणाºया महापालिका शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी नि:शुल्क प्रवेश देण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून खासगी शाळांच्या सहलीबाबत पूर्वपरवानगी घेतलेली असल्यास संबंधित शिक्षकांसह विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ रुपये शुल्क देय असेल. एकाच कुटुंबातील २ प्रौढ व २ मुले (वयोगट ३ ते १२ वर्षे) एकत्र आल्यास त्यांना २५ रुपयांच्या एकत्रित शुल्कात प्रवेश देण्यात येईल. शिल्पग्रामात शिल्पांच्या माध्यमातून १२ बलुतेदारांच्या कला-कौशल्याची ओळख, विविध भारतीय नृत्यशैलींवरील आकर्षक व माहितीपूर्ण शिल्पे, संगीतमय कारंजे, लहान मुलांसाठी खेळणी यासारख्या विविध बाबींचा समावेश आहे.

मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम हे बुधवार वगळता दररोज सकाळी ६ ते १० व सायंकाळी ४ ते ८ खुले असते. दररोज सुमारे ३ हजार नागरिक या शिल्पग्रामास भेट देतात. तर सुटीच्या दिवशी ही संख्या काही पटींनी वाढून १० हजारांचा टप्पाही ओलांडते. जोगेश्वरी वेरावली जलाशयाजवळ असणाºया ३ लाख ७० हजार चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळ (८.५ एकर) असणाºया महापालिकेच्या भूखंडावर आकारास आलेल्या शिल्पग्रामाचे १४ आॅक्टोबर २०१८ रोजी लोकार्पण करण्यात आले होते.