आता माटुंगा रोड ही महिला विशेष स्थानक; महिला दिनी होणार अमंलबजावणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 08:20 PM2018-03-05T20:20:01+5:302018-03-05T20:20:01+5:30

महिला दिनाच्या मुहूर्तावर पश्चिम रेल्वे महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाच्या निर्णयाची अमंलबजावणी करणार आहे. माटुंगा रोड रेल्वे स्थानकाचे कामकाज आणि देखभाल महिला कर्मचा-यांकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

Now Matunga Road is the women's special station; Women's Day will be implemented | आता माटुंगा रोड ही महिला विशेष स्थानक; महिला दिनी होणार अमंलबजावणी 

आता माटुंगा रोड ही महिला विशेष स्थानक; महिला दिनी होणार अमंलबजावणी 

Next

मुंबई : महिला दिनाच्या मुहूर्तावर पश्चिम रेल्वे महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाच्या निर्णयाची अमंलबजावणी करणार आहे. माटुंगा रोड रेल्वे स्थानकाचे कामकाज आणि देखभाल महिला कर्मचा-यांकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वेवर आणखी एका महिला विशेष स्थानकाची भर पडणार आहे.
सर्व रेल्वे मंडळांनी महिला विशेष स्थानकासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना रेल्वेमंत्रालयाने केल्या आहेत. या धर्तीवर पश्चिम रेल्वेने महिला विशेष स्थानकासाठी माटुंगा रोड स्थानकाची निवड केली. या स्थानकात दोन फलाट आहेत. स्थानकात तिकिट तपासनीस, बुकिंग अधिकारी, स्वच्छता कर्मचारी आणि स्थानक सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी अशा सर्व ठिकाणी महिला कर्मचारी नियुक्ती पूर्ण झाली आहे. संबंधित महिला अधिकारी आणि कर्मचा-यांना ८ मार्चपासून स्थानकाचा ‘चार्ज’ घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जागतिक महिला दिनी अर्थात ८ मार्च पासून माटुंगा रोड हे स्थानक महिला विशेष स्थानक म्हणून कार्यान्वित होईल. सद्यस्थितीत स्थानकात १ स्थानक व्यवस्थापक, ३ तिकिट तपासनीस, ५ ते ६ रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी, बुकिंग कार्यालयात कार्यरत असणारे सुमारे १२ ते १३ कर्मचारी आणि २ ते ३ स्वच्छता कर्मचारी असे एकूण २५ कर्मचारी आहेत. या कर्मचा-यांकडून माटुंगा रोड स्थानकाची देखभाल केली जाते, असे पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकूल जैन यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वेवरील विद्यार्थ्यांचे स्थानक म्हणून माटुंगा रोड ओळखले जाते. स्थानकाजवळ महाविद्यालय असल्याने स्थानकावर विद्यार्थ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. सुरक्षिततेसाठी स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून प्रवाशांच्या सुविधेसाठी तिकिट खिडकीसह एटीव्हीएम मशिनची देखील व्यवस्था स्थानकात आहे. सद्यस्थितीत मध्य रेल्वेवर माटुंगा स्थानक हे महिला विशेष स्थानक म्हणून कार्यरत आहे.

Web Title: Now Matunga Road is the women's special station; Women's Day will be implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.