Join us  

खासगी चारचाकी वाहनांसाठी आता एमएच-०१-सीएच मालिका

By admin | Published: April 21, 2016 4:33 AM

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे खासगी संवर्गातील चारचाकी या वाहनांसाठी एमएच-०१-सीएच-००१ ही नवीन मालिका सुरु करण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबई : प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे खासगी संवर्गातील चारचाकी या वाहनांसाठी एमएच-०१-सीएच-००१ ही नवीन मालिका सुरु करण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या सुरु असलेली एमएच-०१-सीडी ही मालिका संपुष्टात येईपर्यत एमएच-०१-सीएच या मालिकेमध्ये उपलब्ध असलेले आकर्षक व पसंतीचे क्र मांक जनतेस तिप्पट शुल्क भरु न आरिक्षत करण्याची तरतूद आहे. नवीन मालिकेतील वाहन क्र मांक आरिक्षत करण्यासाठी फोटो असलेले ओळखपत्र, निवासाचा पुरावा, पॅनकार्ड व वाहन खरेदीची पावती ही कागदपत्रे आवश्यक आहे. कार्यालयीन विहित नमुन्यातील अर्जान्वये कोणताही उपलब्ध वाहन क्रमांक आरक्षित करता येईल, असे परिवहन अधिकाऱ्यांनी कळविले आहे. (विशेष प्रतिनिधी)