आता मासिक टोल पासधारकांना मिळणार ऑनलाइन पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:06 AM2021-06-26T04:06:14+5:302021-06-26T04:06:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई प्रवेशद्वारावरील पाच पथकर नाक्यावर प्रत्यक्ष न जाता ऑनलाइन पद्धतीने मासिक टोल पास खरेदीची ...

Now monthly toll pass holders will get online pass | आता मासिक टोल पासधारकांना मिळणार ऑनलाइन पास

आता मासिक टोल पासधारकांना मिळणार ऑनलाइन पास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई प्रवेशद्वारावरील पाच पथकर नाक्यावर प्रत्यक्ष न जाता ऑनलाइन पद्धतीने मासिक टोल पास खरेदीची सुविधा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे.

वाहनधारकांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने बँकेच्या माध्यमातून पैसे जमा करून एका टोलनाक्याचा अथवा सर्व टोलनाक्यांचा फास्टॅगमध्ये खरेदी व त्याचवेळी ऑनलाइन कार्यान्वित करण्याची सुविधा आहे. प्रचलित पद्धतीप्रमाणे तीन दिवसांत टोल नाक्यावर जाऊन पास कार्यान्वित करण्याची अट रद्द केली आहे. वाहनाच्या समोरील काचेवर टोल नाक्याच्या कंत्राटदाराचे कलर स्टीकर लावण्याची अट रद्द केली आहे, अशी माहिती महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी दिली.

दरम्यान, वाशी, ऐरोली, मुलुंड, मुलुंड व दहीसर या पथकर नाक्यावरून मासिक टोल पास घेऊन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या सोयीसाठी फास्टॅगमध्येच मासिक पासची सुविधा यापूर्वीच महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे.

* मुंबईतील २५ हजार वाहनधारकांना हाेणार फायदा

मुंबईमधील २५ हजार वाहनधारकांना या सुविधेचा फायदा होईल. मासिक पास घेतेवेळी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला आहे.

- कमलाकर फंड,

मुख्य महाव्यवस्थापक, पथकर विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ

..................................................................

Web Title: Now monthly toll pass holders will get online pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.