मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी जलद; मेट्रो स्थानकांसह 'आरे' डेपो होतोय सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 10:32 AM2024-02-20T10:32:41+5:302024-02-20T10:34:32+5:30
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू असून, सीप्झ ते वांद्रे हा पहिला टप्प्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन सज्ज होत आहे.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू असून, सीप्झ ते वांद्रे हा पहिला टप्प्यासाठी मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशन सज्ज होत आहे. या कामाचा भाग म्हणून कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांकडून भुयारी मेट्रोच्या कामाची सातत्याने पाहणी करत कामाचा आढावा घेतला जात आहे. नुकतेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी प्रकल्प संचालक सुबोध गुप्ता, यंत्रणा विभागाचे संचालक राजीव यांच्यासोबत मरोळ नाका या मेट्रो स्थानकाची आणि आरे कार डेपोची पाहणी केली.
मेट्रो- ३ प्रकल्पामुळे सुमारे १६ लाख रेल्वे प्रवाशांना वातानुकूलित डब्यातून प्रवास करणे शक्य होईल. मुंबईतील सहा महत्त्वपूर्ण व्यावसायिक केंद्रांशी, ३० शैक्षणिक संस्था, ३० मनोरंजनाची ठिकाणे, तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आदींशी हा मार्ग जोडणी उपलब्ध करून देईल.
१) पहिल्या टप्प्यादरम्यान मेट्रो सुरू करण्यासाठी मार्च महिन्यापासूनच तयारी सुरू करण्यात येणार आहे.
२) एप्रिल-मेदरम्यान पहिला टप्पा सुरू करण्यावर भर राहणार आहे.
३) पहिला टप्पा सुरू केल्यानंतर बीकेसी ते वरळी असा टप्पा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
४) आचार्य अत्रे स्थानकापर्यंत ऑगस्टदरम्यान मेट्रो सुरू करण्यासाठी हालचाली केल्या जातील.
वर्षाअखेरीस संपूर्ण मार्ग प्रवाशांच्या सेवेत येईल.
पहिला टप्पा : आरे ते बीकेसी
स्थानके : १०, ९ भुयारी तर १ जमिनीवर १२.४४ किलोमीटर
अंतर - २१.३५ किलोमीटर
दुसरा टप्पा : बीकेसी ते कफ परेड
स्थानके : १७
१) मेट्रो १, २, ६ आणि ९ यांना मेट्रो ३ जोडली जाईल.
२) मेट्रोची जोड मोनोलाही मिळणार आहे.
३) चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विमानतळांना हा मार्ग जोडेल.