आता मुंबईकरच करतील कचरा कमी, भविष्यातील धोका लक्षात घेता पुढाकाराची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 02:26 AM2017-09-20T02:26:17+5:302017-09-20T02:26:22+5:30

भविष्यातील धोका लक्षात घेता, आता मुंबईकरांनीच कचरा कमी करण्यासाठी सरसावण्याची गरज आहे. २९ आॅगस्टच्या पुराचा फटका बसल्यानंतर, आता मुंबईकरच आपणहून कचरा कमी करतील, असा आशावाद पर्यावरण तज्ज्ञांसह संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Now the Mumbai will do the waste less, the need of the initiative, considering the future risk | आता मुंबईकरच करतील कचरा कमी, भविष्यातील धोका लक्षात घेता पुढाकाराची गरज

आता मुंबईकरच करतील कचरा कमी, भविष्यातील धोका लक्षात घेता पुढाकाराची गरज

googlenewsNext

अक्षय चोरगे 
मुंबई : भविष्यातील धोका लक्षात घेता, आता मुंबईकरांनीच कचरा कमी करण्यासाठी सरसावण्याची गरज आहे. २९ आॅगस्टच्या पुराचा फटका बसल्यानंतर, आता मुंबईकरच आपणहून कचरा कमी करतील, असा आशावाद पर्यावरण तज्ज्ञांसह संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, २९ आॅगस्टचा पूर हा कच-यामुळेच आल्याचे निदर्शनास आल्यानंतर, ‘लोकमत’ने ‘चला करू या कच-याचे विसर्जन’ ही मोहीम हाती घेतली आणि या मोहिमेला मुंबईकरांकडून, विशेषत: सोसायट्यांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. याच पार्श्वभूमीवर पर्यावरण तज्ज्ञांसह संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी आता मुंबईकरच कचरा कमी करण्यावर भर देतील, अशी आशा व्यक्त केली आहे.
मुंबईत २६ जुलै किंवा २९ आॅगस्टसारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू द्यायची नसेल, तर संपूर्ण नालेसफाई करणे, प्लॅस्टिकचा वापर बंद करणे आणि कच-याचे वर्गीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. या सर्व गोष्टी मुंबईकरांनी पुढाकार घेतल्यावरच होऊ शकतील. पालिकेचे एकतर्फी प्रयत्न हे सर्व प्रश्न सोडवू शकत नाहीत. मुंबईत दररोज ७८०० मेट्रिक टन कच-याची निर्मिती होते. इतक्या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसे डम्पिंग ग्राउंड पालिकेकडे नसल्यामुळे, मुंबईकरांनी कचरा कमी करण्यावर भर द्यावा, असे आवाहन पर्यावरण तज्ज्ञांनी मुंबईकरांना केले आहे.
२९ आॅगस्टच्या पावसानंतर कच-याच्या समस्येकडे सर्वांना लक्ष देणे भाग पडले आहे. मुंबईची पुन्हा तुंबापुरी होऊ द्यायची नसेल, तर मुंबईतील कचरा कमी करावा लागेल. त्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी कचरा करू नये, नाल्यांमध्ये कचरा फेकू नये, प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरू नये, प्लॅस्टिकच्या पिशव्या थेट नाल्यांमध्ये फेकू नये, या गोष्टींकडेसुध्दा गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. हे शहर आपले आहे, ही भावना मुंबईकरांमध्ये जागी होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास, मुंबईकर स्वत:हून शहराच्या स्वच्छतेकडे आणि कचरा कमी करण्याकडे लक्ष देतील, असेही पर्यावरणतज्ज्ञांनी सांगितले.
>‘दत्तक वस्ती’ योजना धूळ खात
मुंबईतील सर्वच झोपडपट्ट्यांमध्ये महापालिकेच्या ‘दत्तक वस्ती’ योजनेची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी ही योजना धूळ खात पडली आहे, तर ज्या ठिकाणी ही योजना सुरू आहे, तेथे गांभीर्याने नागरिक यात सामील झालेले नाहीत. अनेक ठिकाणी दरमहा दहा अथवा वीस रुपये द्यावे लागतात, म्हणून नागरिक त्यांच्या घरातील कचरा हा सफाईवाल्याकडे न देता नाल्यात फेकतात. ते थांबविणे आवश्यक आहे. नाल्यांमध्ये कचरा फेकणाºयांवर आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या वापणा-यांवर दंडात्मक कारवाई करावी.
- सुनील कुमरे, पर्यावरणवादी
>आपणच सोडवू कच-याचा प्रश्न
कचºयाचा प्रश्न सोडविताना आपल्याकडे ‘पॉवर’ नाही, अशी समजूत मुंबईकरांनी करू नये. मुंबईकरांनी ठरविले, तर कच-याचा प्रश्न सोडविण्यासाठी फार वेळ लागणार नाही. आपण कचरा कमी करण्यावर भर देऊ. जो कचरा होईल, त्याचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करू. कचºयाचे वर्गीकरण करून, ओल्या कच-यापासून खतनिर्मिती करू. उत्कृष्ट दर्जाच्या खतांची निर्मिती करून, इथल्या मातीचा दर्जा उंचाविण्यावर भर देऊ. कच-याचे वर्गीकरण करून व्यवस्थापन केले, तर कचरा कमी होईल आणि चांगल्या दर्जाच्या खताची निर्मिती होईल. डम्पिंगचा प्रश्नही सुटेल.
- अफझल खत्री, पर्यावरण तज्ज्ञ

Web Title: Now the Mumbai will do the waste less, the need of the initiative, considering the future risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.