आता आयडॉलच्या विद्यार्थ्यांसाठी नवे अॅप
By admin | Published: March 15, 2017 04:21 AM2017-03-15T04:21:14+5:302017-03-15T04:21:14+5:30
मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत (आयडॉल) लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थी नोकरी करुन शिक्षण घेत असल्यामुळे प्रवेश
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत (आयडॉल) लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थी नोकरी करुन शिक्षण घेत असल्यामुळे प्रवेश, अभ्यासक्रम, परीक्षेचे वेळापत्रक यासाठी विद्यापीठात खेपा मारणे शक्य नसते. आता मात्र या विद्यार्थ्यांचा त्रास वाचणार आहे. कारण, विद्यार्थ्यांसाठी ‘युवा अलर्ट’ नावाचे अॅप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे.
या अॅपमुळे आयडॉलच्या विद्यार्थ्यांना सर्व माहिती मोबाइलवर सहज उपलब्ध होणार आहे. १४ मार्चपासून हे अॅप कार्यान्वित करण्यात आले आहे. या अॅपद्वारे प्रवेश, निकाल, अध्ययन साहित्य, परीक्षा, आयडॉलमधील विविध घडामोडी, बातम्या सहज उपलब्ध होणार आहेत. आयडॉलमध्ये उपलब्ध असणाऱ्या ३४ अभ्यासक्रमांची माहिती या अॅपवर आहे. आयडॉलमध्ये शिक्षण घेणाऱ्या ७७ हजार ५०० विद्यार्थ्यांसह पुनर्परीक्षार्थींना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. या अॅपद्वारे दिवसातून दोनवेळा अलर्ट देण्यात येणार असल्याचे आयडॉलतर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)