हज यात्रेसाठी आता नवे धोरण - मुख्तार नक्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 05:42 AM2017-08-14T05:42:22+5:302017-08-14T05:42:30+5:30
हजयात्रेसाठीचे नवे धोरण पुढील वर्षी आणले जाईल, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले.
Next
मुंबई : हजयात्रेसाठीचे नवे धोरण पुढील वर्षी आणले जाईल, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले. हज हाऊस येथे हजयात्रेच्या आढावा बैठकीसह प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.
नवीन हज धोरण आखण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. नवीन हज धोरणाचा उद्देश संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक बनवणे हा आहे. नवीन धोरणात यात्रेकरूंना सागरी मार्गाने पाठवण्याचा पर्याय समाविष्ट आहे. त्यामुळे यात्रेचा खर्च निम्म्याने कमी होईल. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली २८ आॅगस्ट रोजी नवी दिल्लीत बैठक होणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.