Join us

आता सरकारसाठी नऊ एजन्सी नेमणार खासगी तत्त्वावर कर्मचारी; १३६ प्रकारची पदे भरली जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 6:08 AM

शिपाई, शिक्षक, अकाऊंटंट, क्लार्क ते अधिकाऱ्यांपर्यंतची पदे

मनोज मोघे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सरकारकडून ७५ हजार पदांची भरती करण्याची घोषणा करण्यात आली असतानाच खासगी तत्त्वावर कर्मचारी भरण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिपाई, शिक्षक, अकाऊंटंट, क्लार्क ते अधिकाऱ्यांपर्यंतची पदे थेट खासगी एजन्सीच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून घेण्यात आला. ९ एजन्सीजच्या माध्यमातून सरकारी, निमसरकारी अस्थापने, महामंडळांत १३६ प्रकारची पदे भरली जातील.

प्रशासनातील खर्च आटोक्यात ठेवून विकासकामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी बाह्ययंत्रणेमार्फत कामे करून घेण्याचे सरकारचे धोरण आहे. यासाठी मनुष्यबळ नेमण्यासाठी सरकारने एजन्सी नेमल्या आहेत.

अतिकुशल कर्मचारी पदे

प्रकल्प अधिकारी, समन्वयक, कन्सल्टंट, प्रशिक्षण व्यवस्थापक, इंजिनीअर, अकाऊंटंट, मार्केटिंग एक्स्पर्ट, लेखापाल, विधी अधिकारी, शिक्षक, अधीक्षक, ऑडिओ व्हिज्युअल कोऑर्डिनेटर, टेक्निकल आर्किटेक्ट, हार्डवेअर, सॉफ्टवेअर इंजिनीअर, डेटा एण्ट्री ऑपरेटर, ग्राफीक डिझायनर, सोशल मीडिया एक्सपर्ट, सर्व्हेअर (७४ प्रकारची पदे). वेतन २८ हजार ते १.५०  लाख रुपयांपर्यंत.

कुशल कर्मचारी पदे

इस्टेट मॅनेजर, लायब्रेरेरियन, जनसंपर्क अधिकारी, बँक समन्वयक, उप लेखापाल, हेड क्लार्क, होस्टेल मॅनेजर, जुनिअर अकाऊंटंट, स्टोअर किपर, स्टेनोटायपिस्ट, सिनिअर क्लार्क,टेलिफोन ऑपरेटर, ड्रायव्हर, निरीक्षक, ट्राफिक वॉर्डनय (४६ प्रकारची पदे). वेतन २५ हजार ते ७३ हजारांपर्यंत.

अर्धकुशल कर्मचारी पदे

केअरटेकल स्त्री-पुरुष, सुतार, माळी, सफाई कामगार, लिफ्टऑपरेटर, स्टोअर असिस्टंट (आठ प्रकारची पदे). वेतन २५ हजार ते ३२ हजार रुपयांपर्यंत.

नेमण्यात आलेल्या एजन्सीज

ॲक्सेस टेक सर्व्हिसेस लि.,  सीएमएस आयटी सर्व्हिसेस प्रा. लि., सीएससी ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लि.,  इनोवेव आयटी इन्फ्रास्ट्रक्चर लि., क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि., एस-२ इन्फोटेक इंटरनॅशनल प्रा. लि., सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रा. लि., सिंग इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रा. लि., उर्मिला इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रा. लि.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :राज्य सरकार