आता BMC मध्ये नगरसेवकांची संख्या वाढणार; २२७ ऐवजी २३६ सदस्य निवडून येणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 06:40 PM2021-11-10T18:40:42+5:302021-11-10T18:42:02+5:30

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज (बुधवारी) मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

now number of corporators in BMC will increase Instead of 227 236 members will be elected | आता BMC मध्ये नगरसेवकांची संख्या वाढणार; २२७ ऐवजी २३६ सदस्य निवडून येणार 

आता BMC मध्ये नगरसेवकांची संख्या वाढणार; २२७ ऐवजी २३६ सदस्य निवडून येणार 

Next

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज (बुधवारी) मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

त्यानुसार आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्य-नगरसेवकांची संख्या २३६ अशी होणार आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियमातील (१८८८ चा ३) कलम ५ मध्ये महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांची संख्या २२७ इतकी आहे. ही संख्या २००१ च्या जनगणनेच्या आकडेवारी आधारे निश्चित केलेली आहे. २०११ च्या जनगणनेनंतर निर्वाचित सदस्यांच्या संख्येत बदल करण्यात आलेला नाही व ही सदस्य संख्या कायम राहिली. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार २००१ ते २०११ या दशकात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येमध्ये ३.८७ टक्के इतकी वाढ झाली आहे. लोकसंख्येमध्ये झालेली ही वाढ, वाढते नागरीकरण याबाबी विचारात घेऊन वाढीव प्रतिनिधित्व निश्चित करणे आवश्यक होते. त्यानुसार निर्वाचित सदस्यांची संख्या वाढविण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार निर्वाचित सदस्य म्हणजेच नगरसेवकांची संख्या २३६ अशी करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
 

Web Title: now number of corporators in BMC will increase Instead of 227 236 members will be elected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.