आता डॉक्टरांविरोधात करता येणार थेट आॅनलाइन तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 06:42 AM2019-06-27T06:42:47+5:302019-06-27T06:43:08+5:30

राज्यातील डॉक्टरांविरोधात काही तक्रार असल्यास महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे आॅनलाइन नोंदविता येणार आहे.

Now the online complaint can be done against the doctor | आता डॉक्टरांविरोधात करता येणार थेट आॅनलाइन तक्रार

आता डॉक्टरांविरोधात करता येणार थेट आॅनलाइन तक्रार

googlenewsNext

मुंबई : राज्यातील डॉक्टरांविरोधात काही तक्रार असल्यास महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे आॅनलाइन नोंदविता येणार आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने आॅनलाइन तक्रार वेबपोर्टल सुरू केले आहे. या माध्यमातून परिषदेकडे नोंद असलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांविरोधात सामान्यांना थेट अॉनलाइन तक्रार करून दाद मागता येईल.

वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदणी करणे आणि वैद्यकीय व्यावसायिकांविरोधात प्राप्त तक्रारींची सुनावणी घेणे, ही महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची मुख्य उद्दिष्टे आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने दिल्या जाणाऱ्या सेवांचे १०० टक्के डिजिटायझेशन केले आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे आणि उपाध्यक्ष डॉ. अजिप गोपछडे यांच्या उपस्थित वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विधानभवनात बुधवारी याचे अनावरण झाले.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले की, परिषदेकडे असलेल्या नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाविरोधात प्राप्त होणाºया तक्रारींची चौकशी किंवा सुनावणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम १९६५ कलम २२ अन्वये प्राप्त अधिकारानुसार करण्यासाठी आॅनलाइन कम्प्लेंट वेबपोर्टल परिषदेने नव्याने तयार केले आहे. यामुळे तक्रारदाराच्या तक्रारीचे निवारण सुकर आणि त्वरेने होईल. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या वेबसाइटवरून आॅनलाइन तक्रार वेबपोर्टलवर विनामूल्य प्रवेश मिळू शकेल.

ही पारदर्शक परिणामकारक तक्रार व्यवस्थापन प्रणाली असून, पारंपरिक कागदपत्र पद्धतीऐवजी तंत्रज्ञानाचा आणि संगणकीय माहितीचा वापर करणे शक्य होईल, तसेच आॅनलाइन प्रकरणे परिषदेच्या सदस्यांना निर्धारित वेळेत पाठविण्यास मदत होईल. तक्रारदारास आणि नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्या तक्रारीची सद्यस्थिती सहजपणे कळेल, शिवाय तक्रार जलद सोडविण्यास मदत होईल, असे परिषदेने स्पष्ट केले.

Web Title: Now the online complaint can be done against the doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर