आता हवा फक्त १२ दिवसांचा जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 02:13 AM2017-08-18T02:13:49+5:302017-08-18T02:13:51+5:30

मुंबईत पुन्हा विश्रांती घेणा-या पावसाने तलाव परिसरात आपले कृपाछत्र कायम ठेवले आहे.

Now the only 12-days of water storage | आता हवा फक्त १२ दिवसांचा जलसाठा

आता हवा फक्त १२ दिवसांचा जलसाठा

Next

मुंबई : मुंबईत पुन्हा विश्रांती घेणा-या पावसाने तलाव परिसरात आपले कृपाछत्र कायम ठेवले आहे. सतत पावसाची हजेरी असल्याने तलावही काठोकाठ भरले आहेत. त्यामुळे वर्षभराचे पाण्याचे टेन्शन मिटण्यासाठी आणखी केवळ बारा दिवस जलसाठा वाढणे अपेक्षित आहे.
मुसळधार सरी सतत तलाव परिसरात हजेरी लावत असल्याने या वर्षी पावसाळ्याच्या दीड महिन्यातच पाणीप्रश्न सुटला आहे. मोडक सागर, तानसा, तुळशी तलाव भरून वाहू लागला आहे. तर उर्वरित तलावही काठोकाठ भरले आहेत. वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अवाश्यक आहे. मुसळधार पावसामुळे सर्व प्रमुख तलावांमध्ये एकूण १३ लाख २५ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे.

Web Title: Now the only 12-days of water storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.