Join us  

आता केवळ कोरोना बाधित ३१२ रुग्णांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:07 AM

मुंबई : कोरोना बाधित झालेले ९४ टक्के रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. मुंबईत सध्या पाच हजार २९२ सक्रिय ...

मुंबई : कोरोना बाधित झालेले ९४ टक्के रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. मुंबईत सध्या पाच हजार २९२ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी १,५२९ रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे, तर ३१२ बाधित रुग्ण अत्यवस्थ स्थितीत असल्याने त्यांच्यावर पालिका व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईत मार्च २०२०पासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. आतापर्यंत तीन लाख १२ हजार ६४८ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी दोन लाख ९५ हजार ४६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर ११ हजार ३९६ लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, मुंबईत आता कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आला आहे.

सध्या रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.१३ टक्के एवढा आहे, तर रुग्ण संख्या ५५५ दिवसांनंतर दुप्पट होत आहे. त्यामुळे महापालिका व खासगी रुग्णालयात ८० टक्के खाटा रिक्त आहेत. सक्रिय ५,२९२ रुग्णांपैकी ३,४५१ रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, तर १,५२९ रुग्णालयात उपचार घेत आहेत.

अशी आहेत सद्यस्थिती

प्रकार उपलब्ध खाटा... दाखल रुग्ण... रिक्त

साधारण खाटा १०,३०३ ... २,२४३ ..८,०६०

अति दक्षता १,७०७... ५७१.... १,१३६

ऑक्सिजन ६,८६९ .... १,२३२..... ५,६३७

व्हेंटिलेटर १,०३३ .... ३८० ..... ६५३