Join us

पर्यटकांसाठी आता आकाशही खुले...

By admin | Published: October 11, 2016 3:54 AM

‘प्रवाशांना तसेच पर्यटकांना आता आकाशही खुले होणार आहे. एक वेगळा अनुभव रेल्वे प्रवाशांना देता यावा यासाठी काचेचे छत असलेल्या

मुंबई: ‘प्रवाशांना तसेच पर्यटकांना आता आकाशही खुले होणार आहे. एक वेगळा अनुभव रेल्वे प्रवाशांना देता यावा यासाठी काचेचे छत असलेल्या ट्रेनच्या डब्यांची बांधणी भारतीय रेल्वेकडून केली जात आहे. सुरुवातीला असे तीन डबे बांधण्यात येतील. प्रथम जम्मू-काश्मीर तसेच तामिळनाडूतील नियमित धावणाऱ्या ट्रेनला हे डबे जोडले जाणार असल्याची माहिती आयआरसीटीसीकडून (इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन)देण्यात आली. डिसेंबरपर्यंत हे डबे सेवेत येतील. या डब्यांना आयआरसीटीसी, आरडीएसओ (रिसर्च डिझाईन स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशन), चेन्नईतील रेल्वेची इंटीग्रल कोच फॅक्टरीत तसेच चेन्नईतील पेरम्बूरकडून डिझाईन केले जात आहे. यातील पहिला डबा काश्मीरमध्ये नियमित धावणाऱ्या एका ट्रेनला जोडण्यात येईल. तर अन्य दोन डबे हे दक्षिण-पूर्व रेल्वे मार्गावर नियमित धावणाऱ्या ट्रेनला जोडण्यात येणार आहेत. स्वित्झर्लंडमध्ये अशा प्ट्रेन धावत असून पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहेत. त्यामुळे भारतातील पर्यटकांनाही असाच अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आयआरसीटीसीकडून स्पष्ट करण्यात आले. डब्यांना काचेचे छत लावतानाचा बाहेरील दृश्य व्यवस्थित पाहता यावे यासाठी त्याच डब्यातील आसनव्यवस्थेतही बदल करण्यात आले आहेत. पाय पसरवून प्रवाशांना बसता येईल अशाप्रकारे डब्याची रचना करण्यात आली आहे. डिसेंबरपर्यंतचे उद्दिष्ट जरी ठेवण्यात आले असले तरी यातील एक डबा आॅक्टोबरच्या अखेरपर्यंत आणण्याचा प्रयत्न रेल्वेकडून सुरू आहे. (प्रतिनिधी)