सिंधुदुर्गपाठोपाठ आता रत्नागिरीतून प्रवासी विमानसेवा; उद्धव ठाकरेंनी दिले महत्वाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 10:06 AM2022-02-04T10:06:38+5:302022-02-04T10:06:43+5:30

मुंबई : सिंधुदुर्गपाठोपाठ आता रत्नागिरीतून प्रवासी विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...

now passenger flights from Ratnagiri; Important instructions given by CM Uddhav Thackeray | सिंधुदुर्गपाठोपाठ आता रत्नागिरीतून प्रवासी विमानसेवा; उद्धव ठाकरेंनी दिले महत्वाचे निर्देश

सिंधुदुर्गपाठोपाठ आता रत्नागिरीतून प्रवासी विमानसेवा; उद्धव ठाकरेंनी दिले महत्वाचे निर्देश

Next

मुंबई : सिंधुदुर्गपाठोपाठ आता रत्नागिरीतून प्रवासी विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  गुरुवारी एका बैठकीत दिले. सरकारकडून निश्चितपणे या विमानतळासाठी निधी दिला जाईल, असे ते म्हणाले. 

रत्नागिरीचाविमानतळ हा तटरक्षक दलाच्या अखत्यारित आहे. तेथे नियमित प्रवासी वाहतूक सुरू करायची तर विस्तार करावा 
लागणार असून, त्यासाठी दोन गावांमधील ३३.८१ हेक्टरचे  भूसंपादन करावे लागणार आहे. त्यासाठी जागेची संयुक्त मोजणीही झाली आहे. 

आता भूसंपादन व इतर कामांसाठी ७२ कोटी रुपयांची गरज असल्याची बाब महाराष्ट्र एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिली. त्यावर, रत्नागिरीचा विमानतळ होणे हे कोकणच्या विकासाठी गरजेचा असल्याने आवश्यक तो सर्व निधी दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. बैठकीला पालकमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत,  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील उपस्थित होते.

Web Title: now passenger flights from Ratnagiri; Important instructions given by CM Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.