आता १०० रुपयांत मिळणार पामतेल, पोहे, रवा, मैदा अन् डाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 10:16 AM2024-01-29T10:16:07+5:302024-01-29T10:17:39+5:30

शिधापत्रिकाधारकांना २९ फेब्रुवारीपर्यंत आनंदाचा शिधाचे सवलतीच्या १०० रुपये दरात वाटप सुरू आहे.

Now people will get in 100 rupees for palm oil poha rava maida and dal in ration shop | आता १०० रुपयांत मिळणार पामतेल, पोहे, रवा, मैदा अन् डाळ

आता १०० रुपयांत मिळणार पामतेल, पोहे, रवा, मैदा अन् डाळ

मुंबई : अयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मुंबईत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना २९ फेब्रुवारीपर्यंत आनंदाचा शिधाचे सवलतीच्या १०० रुपये दरात वाटप सुरू आहे.

१०० रुपयांत काय मिळणार?

या आनंदाच्या शिधा संचात १ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो चणाडाळ, रवा, मैदा व पोहे असे सहा शिधा जिन्नस आहेत. आनंदाचा शिधा प्रतिशिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच ई-पॉस प्रणालीद्वारे १०० रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित करण्यात येत आहे. त्यामुळे रेशनकार्डधारकांनी आनंदाचा शिधा घ्यावा. वेळेत मुंबईत यांना मिळाला शिधा तालुक्यातील वितरणानुसार तो बदल

मुंबईत यांना मिळाला शिधा -

जिल्हा क्षेत्र   वितरण
'ए' क्षेत्र         २५२
'ड' क्षेत्र        २०२४
'ई' क्षेत्र          ५९
'एफ' क्षेत्र      ३८९०
जी क्षेत्र         २०३५

कोण आहेत लाभार्थी? 

मुंबईतील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब
शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

किटसोबत स्वस्त धान्यही :

• रेशन दुकानावर उपलब्ध असणारे इतर धान्य गहू, तांदूळ आणि साखर ही स्वस्त मिळणार आहे.

• शासनाकडून आनंदाचा शिधा उपलब्ध होताच तो तत्काळ वितरण केला जातो. 
त्यामुळे रेशनकार्डधारकांनी वेळेत आनंदाचा शिधा घ्यावा.

• काही अडचण अथवा तक्रार असल्यास संबंधित शिधा कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी यांना कळवावे, असे आवाहन मुंबई उपनियंत्रक शिधा कार्यालयाने केले आहे.

Web Title: Now people will get in 100 rupees for palm oil poha rava maida and dal in ration shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.