Join us

आता सुरक्षेवरून राजकीय वाद, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 2:44 AM

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. ते म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करत ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडी काढली जाणार, त्याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,

मुंबई : राज्यातील काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली असून काही जणांना नव्याने सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. ते म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करत ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडी काढली जाणार, त्याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याही सुरक्षाव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात कपात सरकारचा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सुडाचे राजकारण आहे, असा आरोपही उपाध्ये यांनी केला.मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्यात आल्याबद्दल मनसे नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी टीका केली आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या टीकेला उत्तर दिले आहे. भाजप नेत्यांना धोका नसल्याने त्यांची सुरक्षा कमी झाली तर आकांडतांडव, आक्रोश, आकांत, विलाप, बोंब इ. भावना उचंबळून आल्या. परंतु गांधी परिवाराला धोका असतानाही त्यांची व डॉ. मनमोहन सिंग यांची सुरक्षा, स्टाफ कमी करताना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मोदीजींची सूडभावना असते, महाविकास आघाडी सरकारची नाही, असे सावंत म्हणाले.  यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

‘आघाडी कुचक्या मनाची‘n राज साहेबांकडे महाराष्ट्र सैनिकांची सुरक्षा आहे. झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार आहे. शेवटी महविकास आघाडीपण भाजपसारखी कुचक्या मनाचीच निघाली, 

टॅग्स :मुंबईराजकारण