मुंबई - पावसाचे पाणी उपसण्यासाठी महापालिकेने पंपिंग स्टेशन बांधली. पावसाळ्यात पाण्याबरोबर वाहून येणाऱ्या कचºयामुळे पंपिंग स्टेशनही कुचकामी ठरत आहेत. कचरा अडवून पाण्याचा जलदगतीने निचरा होण्यासाठी दोन पंपिंग स्टेशवर बॅक रेक स्क्रीन बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.२००५ मध्ये मुंबईत आलेल्या पुरानंतर पालिकेने ब्रिमस्टोवड अंतर्गत आठ पंपिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय घेतला. गेल्या १३ वर्षांत आतापर्यंत पाच पंपिंग स्टेशन बांधण्यात आले आहेत. तरीही सन २०१७ मध्ये मुंबईत अनेक भागांमध्ये पाणी भरले होते. प्लस्टिकचा कचरा, थर्माकॉल, पाण्याची बाटली जाळ्यांवर अडकून पंपिंग स्टेशनद्वारे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला. हा कचरा जाळ्यांवरच अडकून पाण्याचा निचरा जलद होण्यासाठी बॅक रेक स्क्रीन बसविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.इर्ला नाल्यावर ही स्क्रीन बसविण्याचे कायार्देश देण्यात आले आहेत.लव्हग्रोव्हसाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी अर्थसंकल्पात ६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.चप्पल, लाकूड तुबंवत होते पाणी२०१७ मध्ये प्लास्टिकव्यतिरिक्त चप्पल, लाकूड वाहत येऊन पंपिंग स्टेशन बंद पडले होते. बॅक रेक स्क्रीनमुळे अशा वस्तू पाण्याच्या पंपापर्यंत पोहचणार नाहीत. पंपिंग स्टेशन पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील. गजदरबंद पंपिंग स्टेशनचे काम मे २०१९ पर्यंत पूर्ण होणार आहे. मोगरा पंपिंग स्टेशनसाठी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. इर्ला आणि लव्हग्रोव्ह पंपिंग स्टेशनवर बॅक रेक स्क्रीन बसविण्यासाठी महापालिकेने सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात तब्बल ६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.महापालिकेने आतापर्यंत इर्ला, हाजी अली, वरळी येथे क्लिव्हलँड आणि लव्हग्रोव्ह, रे रोडला ब्रिटानिया आऊटफॉल हे पाच पंपिंग स्टेशन कार्यान्वित करण्यात आली आहेत.
आता पावसाळ्यात तुंबणार नाहीत पम्पिंग स्टेशन , महापालिकेचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 4:31 AM