आता टॅक्सी-रिक्षांमध्येही ‘क्यूआर’ कोड , परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 03:09 AM2018-02-12T03:09:53+5:302018-02-12T03:10:11+5:30

शहरातील अनधिकृत रिक्षा-टॅक्सींवर कारवाई करण्यासाठी ‘क्यूआर’ कोड बसविण्याच्या निर्णयाला राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.

 Now the 'QR' code in taxi-rakshas, ​​approval of the transport authority | आता टॅक्सी-रिक्षांमध्येही ‘क्यूआर’ कोड , परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

आता टॅक्सी-रिक्षांमध्येही ‘क्यूआर’ कोड , परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

Next

महेश चेमटे
मुंबई : शहरातील अनधिकृत रिक्षा-टॅक्सींवर कारवाई करण्यासाठी ‘क्यूआर’ कोड बसविण्याच्या निर्णयाला राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. या ‘क्यूआर’ कोडमुळे प्रवाशांना रिक्षा-टॅक्सीच्या परवानाधारकासह अन्य माहिती उपलब्ध होणार आहे. हा ‘क्यूआर’ कोड लावण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांना ५० रुपये मोजावे लागणार आहेत.
मीटरपेक्षा जास्त पैसे घेणे, रात्री उशिरा प्रवास करणाºया महिला प्रवाशांची सुरक्षितता आणि अधिकृत व अनधिकृत रिक्षा टॅक्सीची ओळख पटविण्यासाठी ‘क्यूआर’ कोड तयार करण्याच्या निर्णयाला नुकतीच मंजुरी देण्यात आली. हा स्टिकर प्रवाशांना दिसेल, अशा ठिकाणी लावण्याच्या सूचना राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालक संघटना आणि संबंधितांना देण्यात आल्या आहेत. या निर्णयानुसार, कमीतकमी २ वर्षे टिकेल, अशा स्वरूपात खासगी संस्थेने परिवहन कार्यालयाने दिलेल्या सूचनेनुसार, क्यूआर कोड स्टिकर तयार करावेत. त्याचबरोबर, प्रत्येक स्टिकरला विशिष्ट क्रमांक देऊन, संबंधित वाहन आणि क्रमांक याचा तपशील आरटीओ कार्यालयात नोंदवावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
या क्यूआर कोडच्या स्टिकरचा आकार २८ सेंटीमीटर बाय १० सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावा आणि संबंधित प्रादेशिक कार्यालयाच्या सही-शिक्क्याशिवाय स्टिकर लावू नये, असे परिवहन प्राधिकरणाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
‘अ‍ॅप बेस’ टॅक्सींना मुभा?
परिवहन प्राधिकरणाने ‘क्यूआर’ कोड तयार करून, रिक्षा-टॅक्सीमध्ये लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, प्राधिकरणाने केलेल्या सूचनांमध्ये अ‍ॅप बेस टॅक्सी सेवांबाबत कोणताच उल्लेख नाही. यामुळे ‘क्यूआर’ कोड केवळ काळी-पिवळी टॅक्सी आणि रिक्षांसाठीच असून, अ‍ॅप बेस टॅक्सींना यातून मुभा देण्यात आली आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
१ हजाराचा दंड : ‘क्यूआर’ कोड दर्शनी भागात न लावणाºया रिक्षा-टॅक्सी चालक पहिल्यांदा आढळल्यास, १ हजार दंड किंवा ५ दिवसांसाठी परवाना रद्द या दोघांपैकी एक दंड म्हणून करण्यात येणार आहे. दुसºयांदा आढळल्यास १० दिवस किंवा ३ हजार दंड आणि तिसºयांदा आढळल्यास १५ दिवस परवाना रद्द आणि ५ हजार दंड आकारण्यात येणार आहे.

Web Title:  Now the 'QR' code in taxi-rakshas, ​​approval of the transport authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई